• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

मध्यरात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे हा विनयभंगच : मुंबई हायकोर्ट

Our Media by Our Media
December 25, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
135 1
0
high-court-judge
20
SHARES
974
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: एखाद्या महिलेच्या खाटेवर बसून मध्यरात्री तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिचा विनयभंगच आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीने महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे म्हणजे हा तिचा विनयभंग आहे, असे खंडपीठाने पुढे स्पष्ट केले.

न्यायमूर्ती मुकुंद सेवलीकर यांच्या खंडपीठासमोर जालना जिल्ह्यातील ३६ वर्षीय परमेश्वर ढगे याने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी सुरु आहे. शेजारी असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविले. न्यायालयाने त्याला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या निर्णयाला त्याने औरंगाबाद खंडपीठात आ‍व्हान दिले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

फिर्यादीच्या खटल्यानुसार, जुलै २०१४ मध्ये ढगे हा सायंकाळच्या वेळी पीडितेच्या घरी गेला आणि तिला तिचा पती घरी कधी परत येणार असे विचारले. तिने त्याला सांगितले की, तिचा नवरा परगावी गेला आहे आणि तो रात्री परत येणार नाही. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ढगे पुन्हा पीडित महिलेच्या घरी गेला, तेव्हा पीडिता झोपली होती. त्याने तिच्या घराचा दरवाजा उघडला. दरवाजाला आतून कडी नव्हती. आणि तो तिच्या खाटेवर जाऊन बसला आणि त्याने तिच्या पायाला स्पर्श केला.

दरम्यान, आरोपीने आपला बचाव करत दावा केला की त्याचा विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नव्हता. यावर न्यायमूर्ती सेवलीकर म्हणाले, “रेकॉर्डवरील नोंदीनुसार हे स्पष्ट होते की ढगे यांचे कृत्य महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवणारे होते.”

“तो पीडितेच्या पायाजवळ बसला आणि त्याने तिच्या पायाला स्पर्श केला. तो तिच्या खाटेवर बसला होता. हे त्याचे वर्तन लैंगिक हेतूने होते. तसेच रात्रीच्या वेळी त्याने पीडितेच्या घरी जाण्याचे अन्य कोणतेही कारण नव्हते.” असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

न्यायमूर्तींनी पुढे नमूद केले की, ढगे हा रात्रीच्या वेळी पीडितेच्या घरी काय करत होता याचे तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. शिवाय, रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग करणे होय.

“यावरुन हे स्पष्ट होते की आरोपी हा लैंगिक हेतूने शेजारी महिलेच्या घरी गेला होता आणि त्याने तिचा विनयभंग केला. त्यामुळे ढगे याला विनयभंग प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविण्यात कोणतीही चूक केली नाही,” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

Tags: Bombay High Court
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत करा

Next Post

तगडा पोलीस बंदोबस्त अन लालपरी अकोला अकोट धावली लालपरीला बघण्यासाठी एकच गर्दी,काही काळ तणाव

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तगडा पोलीस बंदोबस्त अन लालपरी अकोला अकोट धावली लालपरीला बघण्यासाठी एकच गर्दी,काही काळ तणाव

तगडा पोलीस बंदोबस्त अन लालपरी अकोला अकोट धावली लालपरीला बघण्यासाठी एकच गर्दी,काही काळ तणाव

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा

परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.