अकोला, दि.23: महिला व बाल विकास कार्यालयाव्दारे जिल्ह्यातील शासकीय जागृती महिला राज्यगृह संस्थेतील 18 वर्षावरील महिलेचे दोन्ही डोस देवून लसीकरण पुर्ण केले. शिबीराच्या माध्यमातून ऑगस्ट महिण्यात पहिला डोस तर नोव्हेंबर महिण्यात दुसरा डोस देण्यात आला, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.
महिला राज्यगृहात 44 महिला प्रवेशीत असून महिला राज्यगृहात निराधार, निराश्रीत, पिडीत महिला दाखल होतात. कोरोना विषाणु तसेच कोरोनाच्या म्युटेशन ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संस्थेतील सर्व महिला व कर्मचाऱ्यांना लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. लसीकरण करण्याकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, संस्थेचे अधिक्षक अमित रायबोले व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.