अकोला, दि.१७ : अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘अल्पसंख्याक यांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव’ या विषयावर व्याख्यानाचे शनिवार दि. १८ रोजी लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे आयोजीत करण्यात आले आहे.
या कार्याक्रमाला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात व्याख्याते जेष्ठ विधीज्ञ ॲड. मोहम्मद डोकाडिया,भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष पी.जे. वानखडे, सचिव डॉ. एम.आर.इंगळे,महाराष्ट्र राज्य अप्लसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहेल परवेज अली, सचिव अलिम देशमुख व ॲड. नजीब शेख उपस्थित राहून प्रबोधन करणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व समन्वयन गजानन महल्ले यांनी केले आहे.