• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, घटनेने दहशत

Our Media by Our Media
December 17, 2021
in राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
113 1
0
tiger
20
SHARES
815
VIEWS
FBWhatsappTelegram

चंद्रपूर :  वेळवा गावालगतच्या पुलाजवळ बसून असलेल्या एका मनोरुग्ण महिलेवर वाघाने हल्ला केला. यामध्ये महिला ठार झाली. ही घटना (गुरुवार) सकाळच्या सुमारास घडली. संध्या बावणे असे मृत महिलेचे नाव आहे. ती वेळवा येथील रहीवासी आहे.

मागील काही महिन्यांपासून पोंभुर्णा तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत. मागील काही दिवसांपासून वेळा येथील महिला मनोरूग्ण असल्याने ती इतरत्र फिरत होती. कुठेही जाणे, कुठेही बसणे तिची नित्याची बाब झाली होती. मात्र गुरूवारी संध्या बावने ही महिला पोंभूर्णा पासून तीन किमी अंतरावरील वेळवा गावालगतच्या पुलाजवळ एकटीच बसून होती. दरम्यान या परिसरातील जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करुन तिला ठार केले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

वाघ एवढ्यावरच थांबला नाही. त्याने सदर महिलेच्या शरीराचा बराच भाग खाल्याचे समजते. सदर घटना घडताच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळी येऊन मृतदेहाची शोधाशोध केली. काही अंतरावर पडून असलेल्या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.

काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला ही मनोरूग्ण असल्याने ती परिसरात फिरत होती. गुरूवारची सकाळ तिच्या जिवनाची शेवटची सकाळ ठरली. तिच्या पश्चात दोन मुले असल्याची माहिती आहे. काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला ठार करणारा हा पट्टेदार वाघ असावा, तर काहींच्या मते बिबट्या असल्याची चर्चा आहे. या घटनेने वेळवा परिसरात प्रचंड दहशत आहे. या दु:खदायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी याच मार्गाने जाणा-या दुचाकीस्वारांवर वाघाने हल्ला केला होता.

मागील महिन्याभरापासून पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत सूरू आहे. महिनाभरात वाघाने चार बळी घेतले आहेत. दरम्यानच्या काळात वनविभागाने गस्त वाढविली. वाघाचा हालचालीवर नजर ठेवली होती. मात्र आज पुन्हा वाघाने हल्ला करीत महीलेचा बळी घेतला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने तालुक्यात दहशत पसरली आहे.

बावणे यांच्‍या कुटूंबियांची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सांत्‍वनापर भेट

पोंभुर्णा तालुक्‍यातील वेळवा येथे संध्‍या विलास बावणे या महिलेचा वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यु झाला. या घटनेनंतर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतक संध्‍या बावणे यांच्‍या कुटूंबियांना भेट देत त्‍यांचे सांत्‍वन केले. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयांना आ. मुनगंटीवार यांनी आर्थिक मदत केली.

आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर मुख्‍य वनसंरक्षक एन. प्रविण यांना घटना स्‍थळावरुन दुरध्‍वनीद्वारे संपर्क साधत मृतकाच्‍या कुटूंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. त्‍याच प्रमाणे मृतकाच्‍या कुटुंबातील मुलगा आणि मुलीला त्‍वरित रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या सूचना सुध्‍दा त्‍यांनी दिल्‍या. या परिसरातील वाघाचा धुमाकुळ थांबविण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍वरित पिंजरे बसवावेत व वाघाला जेरबंद करण्‍याच्‍या दृष्‍टीने तातडीने उपाययोजना कराव्‍या अशा सूचना देखिल आ. मुनगंटीवार यांनी मुख्‍य वनसंरक्षकांना दिल्‍या.

Tags: AttackchandrapurtigerWoman
Previous Post

बोर्डीतील गुरुदेव विद्या मंदिर शाळेचे शिक्षक, शिक्षिका करतात अपडाऊन

Next Post

स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेचा उपक्रम; पशूंमधील आधुनिक भुलपद्धतीः एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Release of training manual

स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेचा उपक्रम; पशूंमधील आधुनिक भुलपद्धतीः एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक

तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा

ओबीसी आरक्षण : १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.