तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात बुधावारी लष्कराचे एमआय १७ व्ही ५’ हेलिकॉप्टर कोसळले (chopper crash) होते. या दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला होता. आज ( दि. ९ ) हवाई दल प्रमुख विवेक राम चौधरी यांनी (chopper crash) अपघातस्थळाची पाहणी केली. हवाई दलाच्या पाहणीत मिळाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधील ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला. त्यामुळे आता अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
हवाई दल प्रमुख विवेक राम चौधरी यांच्यासमवेत यावेळी त्यांच्यासोबत तामिळनाडूचे पोलिस महासंचालक सी. सेलेंद्र बाबू उपस्थित होते. दरम्यान, तामिळनाडू फॉरेन्सिक सायन्स विभागाचे प्रमुख श्रीनिवास यांनीही घटनास्थळी भेट दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राजस्थान सिंह देणार आज संसदेत माहिती
तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात झालेल्या घटनेसंदर्भात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे संसदेत माहिती देणार आहेत. संरक्षण मंत्री सकाळ ११ वाजून १५ मिनिटांनी या घटनेची माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘ब्लॅक बॉक्स’ सापडला
हवाई दलाच्या पाहणीत मिळाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधील ‘ब्लॅक बॉक्स’ सापडल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे आता अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. कारण ‘ब्लॅक बॉक्स’ हा विमान असो की हेलिकॉप्टरमधील महत्वाचे उपकरण आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती ‘ब्लॅक बॉक्स’मुळ मिळण्यास मदत होते.