अकोला– महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२१ साठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची आज छाननी झाली. त्यात दोघा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले,असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.
अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे या प्रमाणे-
गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया (शिवसेना) चार अर्ज, वसंत मदनलाल खंडेलवाल(भाजपा) चार अर्ज.या दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी चार असे एकूण आठ नामनिर्देशन पत्र, दाखल केले होते, ते सर्व वैध ठरले आहेत. शुक्रवार दि.२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे.