तेल्हारा(प्रतिनिधी)– तेल्हारा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठा येथील पांढरी या भागातील सर्वे नं . ५० व त्या भागातील नागरिकांना शासनाने तेल्हारा शहराच्या हद्दी मध्ये समाविष्ट केले आहे परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून तेथील नागरिक शासनाच्या अनेक योजनान पासून वंचित राहिले असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे आम्हाला शहराच्या हद्दीत समाविष्ट केले मग सुविधा द्या अशा प्रकारची मागणी २४ नोव्हेंबरला पांढरी या भागातील नागरिकांनी तेल्हारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
कोठा गावातील पांढरी हा भाग हद्द वाढीमध्ये तेल्हारा शहरात समाविष्ट झाला आहे परंतु त्यांना साधा रहिवासी दाखला नगरपालिका देत नाही आणि कोठा येथील ग्रामपंचायत सुद्धा देत नाही त्यामुळे आमचा वाली कोण असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे तसेच जन्म-मृत्यूची नोंद सुद्धा कोठा ग्रा.प. व तेल्हारा न. प. मध्ये होत नसल्याने आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हा आमच्यावर मोठा अन्याय होत आहे .
अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तेल्हारा शहरामध्ये समाविष्ट केल्यामुळे शहरातील नागरिकांकरिता ज्या सुख सुविधा दिल्या जातात त्या सुविधा देण्यात याव्यात , या भागांमध्ये अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत आहे दूषित पाण्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे आमची तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या गटारी बांधण्यात याव्यात , रस्त्यांची , दिवाबत्ती, स्ट्रीट लाइट ची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे तेल्हारा शहरामध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजना सुरू आहे त्याच प्रमाणे या योजनेचा लाभ आमच्या भागातील नागरिकांना देण्यात यावा तसेच आमच्या भागातील स्वच्छते बाबत दररोज नालेसफाई ,साफ-सफाई करण्याकरिता सफाई कामगारांची व्यवस्था करून नाल्यांची साफसफाई करावी व आमच्या परिसरामध्ये साचत असलेला कचरा उचलून नेण्याकरिता घंटागाडी सुरु करावी अशाप्रकारे ज्याप्रमाणे तेल्हारा शहरामध्ये सर्व परिसरामध्ये व नागरिकांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या आम्हाला देण्यात याव्यात सदर सुख-सुविधा , मूलभूत सुविधा तसेच जन्म-मृत्यूची नोंद इतर सर्व बाबी १५ दिवसांच्या सात पुरविण्यात याव्यात अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशा प्रकारचे निवेदन कोठा गावातील पांढरी या भागातील नागरिकांनी व तेल्हारा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना दिले आहे देण्यात आलेल्या निवेदनावर पांढरी या भागातील समस्त नागरिकांच्या व विकास मंचच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.