• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

एक दशकापेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा अकोला- पूर्णा ब्रॉडगेज उपेक्षित

Our Media by Our Media
November 11, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
118 2
0
akola
26
SHARES
854
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात सरळ व कमी लांबीच्या लोहमार्गातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या अकोला ते पूर्णादरम्यानच्या मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होण्याला गुरुवार, ११ नोव्हेंबर रोजी १३ वर्षे पूर्ण होत आहेत. १३ वर्षे उलटून गेल्यानंतरही या मार्गाने मोजक्याच गाड्यांचे आवागमन सुरू असल्याने दक्षिण-मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील हा ब्रॉडगेज मार्ग अजूनही उपेक्षितच असल्याच्या भावना रेल्वे प्रवाशांची आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळांतर्गत येत असलेल्या पूर्णा ते अकोला या मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम नाेव्हेंबर २००८ मध्ये पूर्णत्वास आले होते. ११ नोव्हेंबर २००८ रोजी या मार्गाची चाचणी घेण्यासाठी निरीक्षण गाडी धावली होती. ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाल्यानंतर या मार्गावरून पूर्णा-अकोला ही पॅसेंजर गाडी सुरू करण्यात आली. त्यानंतर उत्तर भारताकडे जाणाऱ्या आणखी काही गाड्या या मार्गाने वळविण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरील हिंगोली, बसमत, वाशिम, बार्शीटाकळी यासारखी महत्त्वाची रेल्वेस्थानके ब्रॉडगेजने जोडली गेली. यानंतर या मार्गाने लांब पल्ल्याच्या आणखी गाड्या सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, काही मोजक्या प्रवासी गाड्यांचा अपवाद वगळता, या मार्गाने बहुतांश मालगाड्याच धावत आहे. गत १३ वर्षांत अकोलानजीकच्या शिवणी ते वाशिमपर्यंतच या मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. अकोला ते पूर्णापर्यंत विद्युतीकरण झाल्यास नवीन गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

या गाड्या धावतात

हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस
नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस
अमरावती-तिरुपती एक्स्प्रेस
अकोला-पूर्णा डेमू
नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस
इंदूर-अमृतसर एक्स्प्रेस
नरखेड-काचिगुडा इंटरसिटी
नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस

लोकप्रतिनिधींची उदासीनता

सत्तेत असतानाही लोकप्रतिनिधींकडून या मार्गाच्या विकासासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत, असे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे गत १३ वर्षांत या मार्गावर अकोल्यावरून सुरुवात होणारी एकही नवीन गाडी सुरू होऊ शकली नाही.

या आहेत प्रलंबित मागण्या

पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढविणे
अकोला स्थानकावर पिट लाईन बनविणे
नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे अकोला स्थानकावरून सुरू करणे
साप्ताहिक गाड्या दैनंदिन करणे
अकोला – अकोट मार्ग सुरू करणे
दक्षिण मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडणे
अकोला – परळी, अकोला – पूर्णा पॅसेंजर पूर्ववत सुरू करणे

Tags: AkolaPurna Broadgauge
Previous Post

Drug Seized Gujarat : द्वारकेत ३५० कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरात समुद्रकिनारा बनला तस्करीचा मार्ग?

Next Post

जळगावात दोन मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
jalgao

जळगावात दोन मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही

एसटी ST Bus

S T Strike : सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.