• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

cm thackeray st strike : संप मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

Our Media by Our Media
November 10, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
138 6
0
cm-uddhav-thakrey-maharashtra-cm
22
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई:  cm thackeray st strike : एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे. त्यामुळे समस्त संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी संप ( cm thackeray st strike ) मागे घ्यावा असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या. राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( cm thackeray st strike ) यांनी केले आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन…

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलंय. सरकार म्हणून लोकांनाही आम्ही जबाबदार आहोत. प्रशासनाचा धाक म्हणून काल निलंबनाची कारवाई झालीय. कुणावरही कारवाई करण्याची सरकारची इच्छा नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती करतो की, कर्मचाऱ्यांनी हा संप थांबवावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले.

हा संप हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवला असल्याचे परब म्हणाले. जे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रश्‍नी काही राजकीय़ पक्ष पोळ्या भाजून घेताहेत. त्यांचा कट झालेल्या पगाराची जबाबदारी हे राजकीय नेते घेणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला. त्यांनी गोपीचंद पळकर, सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली. हे नेते कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेतात का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी १-२ दिवसांची नाही. त्रिसदस्यीय समितीला १२ आठवड्यात अहवाल सादर करावा लागणार आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे. तरीही कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर बोललो आहे. काही मागण्यांवर तोडगा काढू. उच्च न्यायालयाचा अवमान करू नका. कामावर हजर व्हा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचं लेखी हायकोर्टत दिलंय. अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. भाजपचे काही नेते या आंदोलनाला खतपाणी घालताहेत. भाजप नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. असे आवाहनही त्यांनी केले.

Tags: cm thackeray st strikemsrtc
Previous Post

खुशखबर : २ हजार ८८ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता ; मंत्री उदय सामंतांची घोषणा

Next Post

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
आमदार बच्चू कडू

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

election

विशेष संक्षिप्त पुनरिक्षणांतर्गत मतदार नोंदणी अभियान सर्व नागरिकांनी लाभ घ्‍यावा- उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.