महाराष्ट्रातल्या ८ विधानपरिषद जागांची मुदत संपत आली आहे. यापैकी ६ जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. या ६ विधानपरिषदेच्या जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर १४ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. (MLC Election)
राज्याचे गृहमंत्री सतेज पाटील, आमदार भाई जगताप, रामदास कदम यांच्यासह अन्य उमेदवार मैदानात असणार आहेत. कोल्हापूर विधानपरिषदेच्या जागेसाठी ६ वर्षांपुर्वी सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील लढतीची चर्चा अखंड राज्यभर गाजली होती. याचबरोबर रामदास कदम, भाई जगताप यांच्याविरोधात कोण राहणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
MLC Election : या आमदारांची मुदत संपली
आमदार सतेज पाटील (कोल्हापूर), भाई जगताप, रामदास कदम (मुंबई), अमरिषभाई रसिकलाल पटेल (धुळे, नंदुरबार), गोपीकीसन राधाकिसन बिजोरिया (अकोला, बुलडाणा, वाशिम), प्रशांत प्रभाकर परिचारक (सोलापूर), अरूणकाका जगताप (अहमदनगर), व्यास गिरीषचंद्र बच्चाराज.
सतेज पाटील यांच्याविरूद्ध कोण?
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत 31 डिसेंबर 2015 ला काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा 63 मतांनी पराभव केला होता. पाटील यांना 220, तर महाडिक यांना 157 मते मिळाली होती. येत्या निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांच्या विरोधातील उमेदवार कोण असणार, याची चर्चा रंगली आहे.