अकोला: दि.2: भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेअंतर्गत टपाल जीवन विमाकरीता थेट अभिकर्ता (Direct Agent) यांची नेमणूक करण्याकरीता इच्छुक उमेदवारांनी गुरुवार दि. 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन डाक विभागाचे प्रवर डाक अधिक्षक यांनी केले.
नियुक्तीकरीता पात्रता : उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी 18 ते 50 वर्षा दरम्यान असावा, उमेदवार दहावी किंवा मान्यता प्राप्त बोर्डाची समतुल्य परीक्षा उर्तीण असावा. बेरोजगार किंवा स्वंयरोजगार व्यक्ति, माजी जीवन विमा सल्लागार किंवा कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी ई. टपाल जिवन विमा थेट अभिकर्ता या पदासाठी आवेदन करू शकतात. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे, व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्या बाबतचे ज्ञान या आधारावर केले जाईल. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयेची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून एनएससी किंवा केव्हीपी च्या स्वरुपात ठेवावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रूपांतरित केली जाईल. परीक्षा तात्पुरत्या स्वरूपाच्या परवाना नियुक्ती नंतर तीन वर्षाच्या आत उर्तीर्ण करणे अनिवार्य राहील. निवड झालेल्या उमेदवारास टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन देण्यात येईल.
अर्जाचा नमूना प्रधान डाकघर किंवा प्रवर डाक अधीक्षक यांच्या कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज, शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व आवश्यक कागदपत्रासोबत दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या दरम्यान उपस्थित रहावे, असे आवाहन डाक विभागाव्दारे करण्यात आले आहे.