• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

aryan khan cruise drugs case : आर्यन खानची ‘आर्थर रोड’ मधून सुटका

Our Media by Our Media
October 30, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
82 4
0
aryan khan
19
SHARES
617
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी आर्यन खान याला ( aryan khan cruise drugs case ) गुरुवारी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने जामीन मंजूर केला होता. अखेर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्‍यानंतर त्‍याची शनिवारी सकाळी मुंबईत आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्‍यात आली.

जामीन मंजूर झाल्‍यानंतर शुक्रवारी सत्र न्‍यायालयातील जामीनपत्र भरण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्‍यामुळे जामिनाची कागदपत्रे मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील पेटीत जमा होवू शकली नाहीत. त्‍यामुळे आर्यनची सुटका लांबणीवर पडली होती. शनिवारी सकाळी जामीन पेटीत कागदपत्रे जमा झाली आहेत. सकाळी दहापर्यंत त्‍याची सुटका होईल, अशी अशी माहिती कारागृहाच्‍या सूत्रांनी दिली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

aryan khan cruise drugs case : आर्थर रोड कारागृहाबाहेर गर्दी

अभिनेता शाहरुख खान हा सकाळीच आपल्‍या मन्‍नत बंगल्‍यातून आर्थर रोड कारागृह परिसरात आला होता. शाहरुख खानचा अंगरक्षक रवी याच्‍यासाेबत आर्यन खान कारागृहाबाहेर आला. यानंतर ताे शाहरुख खान समवेत मन्‍नतला रवाना झाला. यावेळी आर्थर रोड कारागृहाबाहेर माेठी गर्दी झाली हाेती.

ड्रग्‍ज प्रकरणी अटक झालेल्‍या आर्यन खानची जामीनावर सुटका करताना न्‍यायलयाने एकुण १४ अटी ठेवल्‍या आहेत. न्‍यायालयाच्‍या परवानगीशिवाय त्‍याला देशाबाहेर जात येणार नाही. तसेच आर्यन खानकडून जामीनासाठीच्‍या अटींचा भंग झाल्‍यास त्‍याची जामीन रद्‍द करावी, अशी मागणी एनसीबी करु शकते, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल. आर्यन खान याला दर शुक्रवारी एनसीबीच्‍या कार्यालयात उपस्‍थित राहावे लागणार आहे.

‘एनसीबी’ने केला होता जामिनास विरोध

गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी पुन्‍हा मुंबई उच्‍च न्‍यायालयात न्‍यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्‍यासमोर आर्यन खानच्‍या याचिकेवर सुनावणी झाली होती. यावेळी एनसीबीच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना अतिरिक्‍त सॉलिसिएर जनरल ( एएजी) अनिल सिंग म्‍हणाले होते की, आर्यन खान मागील दोन वर्षापासून तो नियमित ड्रग्‍जचे व्‍यसन करत आहे. मागील दोन वर्षांमध्‍ये त्‍याने मोठ्य्या प्रमाणावर ड्रग्‍ज विकत घेतले आहे. तो ड्रग्‍ज सेवनाबरोबरच त्‍याची विक्रीही करत होता. ड्रग्‍ज रॅकेटचा तो भाग आहे, असे सांगत त्‍याला जामीन देण्‍यात येवू नये, अशी मागणी त्‍यांनी केली होती.

Tags: Aryan Khan Drug CaseBail HearingNCBsharukh khan
Previous Post

हसन मुश्रीफ यांची मोर्चामध्येच घोषणा; दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना बोनस

Next Post

ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा, दिवाळी बोनस म्हणून 750 रुपये, त्यासाठीही नियम अटी!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
uddhav Thakre

ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा, दिवाळी बोनस म्हणून 750 रुपये, त्यासाठीही नियम अटी!

murder crime

पत्नीचा गळा आवळून खून; पतीची आत्महत्या, पाचोरा तालुक्यातील धक्‍कादायक घटना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.