मुंबई: 26 ऑक्टोबर : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण, येत्या गुरुवारपासून म्हणजेच 28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेवर (Western Railway) लोकलच्या 100 टक्के फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. शासनाने निवडलेल्या श्रेणींनाच एसओपीनुसार प्रवास करण्याची परवानगी आहे. उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा प्री-कोविड स्तरावर म्हणजेच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 100% चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 मार्च 2020 पासून कोविड-19 लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या.
उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रवाशांच्या श्रेणी, नंतर ऑगस्ट 2021 मध्ये आणि अलीकडच्या आठवड्यात वाढवण्यात आल्या. सध्या, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अनुक्रमे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 1702 आणि 1304 उपनगरीय सेवा चालवत आहेत, ज्या त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांच्या 95.70 % आहे. आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात प्री-कोविड स्तरावर 100% उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर 1774 आणि पश्चिम रेल्वेवर 1367 सेवा चालवण्यात येणार आहेत. फक्त राज्य सरकारने निवडलेल्या श्रेणी आणि त्यांनी जाहीर केलेल्या SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे.
14 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही महाराष्ट्रात सोमवारी (गेल्या 24 तासात) कोरोना विषाणूचे (corona virus) 899 नवे रुग्ण आढळून आले. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील रुग्णसंख्येनंतर ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आज राज्यात कोविड-19 मुळे 12 जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण 2.12 टक्के इतके कमी झाले आहे. सर्वात महत्त्वाची आणि दिलासा देणारी बाब म्हणजे चौदा जिल्ह्यांमध्ये कोविड-19 चा एकही रुग्ण आढळलेला नाही आणि बारा जिल्ह्यांमध्ये एकेरी संख्येत नवीन कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे आणि रत्नागिरी वगळता कोणत्याही जिल्ह्यात मृत्यूची नोंद झालेली नाही. रिकव्हरी रेट 97 टक्के पेक्षा जास्त सोमवारी एकूण 1,586 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रूग्णांचा रिकवरी रेट सध्या 97.47 टक्के आहे. सरकारच्या दैनिक कोविड-19 बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार सध्या 1,83,092 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 957 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.