• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

NCB vs Nawab Malik: कोण आहे फ्लेचर पटेल?; मंत्री नवाब मलिकांचा NCB अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

Aryan Khan Arrested Case: मागील अनेक दिवसांपासून NCB विरुद्ध नवाब मलिक असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात आता नवाब मलिकांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे.

Our Media by Our Media
October 16, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
92 5
0
Nawab malik
15
SHARES
691
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : क्रुझ पार्टीवर धाड टाकून NCB नं ८ जणांवर अटकेची कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) यालाही अटक झाली आहे. सध्या आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये कैदेत आहे. परंतु या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी NCB वर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून NCB विरुद्ध नवाब मलिक असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यात आता नवाब मलिकांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे. कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? याबाबतचा तपशील लवकरच येथे उघड करेन असं सांगत मलिकांनी फ्लेचर पटेलचा एक फोटो ट्विटमध्ये जोडला आहे या फोटोत एक महिलाही दिसत आहे. नेमकं हा व्यक्ती कोण याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. फ्लेचर पटेल हा NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या ओळखीतला असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

फ्लेचर पटेल या व्यक्तीला तीन केसमध्ये साक्षीदार बनीवण्यात आले. कौटुंबिक मित्र कसा स्वतंत्र साक्षीदार बनू शकतो. या फ्लेचरचे वानखेडे यांच्या निकटवर्तीय असलेल्या महिलेसमवेत फेसबुकवर फोटो, त्यावर विथ लेडी डॉन म्हणून फोटो कँप्शन लिहिलं आहे. वानखेडे हे खोट्या केसेस करुन बॉलीवूडला दबाव टाकतात हे स्पष्ट झाले. एनसीबीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन फ्लेचर पटेल, लेडी डॉन यांचा आणि कौटुंबिक मित्र असलेल्या एकाच व्यक्तीला तीन केसेस मध्ये का स्वतंत्र साक्षीदार बनविण्यात आले? याचा खुलासा करण्याचे आव्हान मलिकांनी दिले आहे.

NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा

क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी(Mumbai Cruise Drugs Case) NCBने एकूण ११ जणांना ताब्यात घेतले होते. मग यातील तिघांना कुणाच्या निर्देशावरून सोडण्यात आले, असा प्रश्न नवाब मलिकांनी उपस्थित केला होता. मलिक म्हणाले होते की, क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर टाकलेल्या छाप्यात एनसीबीने ११ जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. मात्र, अवघ्या तीन तासांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारतीय यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांना सोडण्यात आले. एनसीबीने कुणाच्या निर्देशावरून या तिघांना सोडले? आम्ही एनसीबीकडे यासंदर्भात सत्य काय, याचा खुलासा करण्याची मागणी करत आहोत. समीर वानखेडे आणि भाजप नेते यांच्यात काही चर्चा झाली असावी, असे आम्हाला वाटते, असेही मलिक यांनी दावा केला होता.

NCB नं दावा फेटाळला

दरम्यान, क्रूझवर २ ऑक्टोबरला टाकलेला छापा आणि कारवाई ही कायदेशीर नियमांनुसारच होती. छाप्यादरम्यान १४ जणांना कलम ६७ च्या नोटिशीनुसार ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पुराव्याच्या आधारे त्यातील ८ जणांना अटक केली होती, तर इतरांना पुराव्याअभावी सोडण्यात आले होते. एनसीबीने एकही नियम मोडलेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा आहे असल्याचं सांगत NCB ने नवाब मलिकांचा दावा फेटाळला.

Tags: arayn khanMumbai Cruise Drugs CaseNawab MalikNCB
Previous Post

इन्कम टॅक्सच्या छाप्यांमध्ये १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; अनेक कनेक्शन उघड

Next Post

पातुरचीं स्मशानभूमी फुलझाडानी बाहरली सौंदर्यकरणासाठी उमाळे परिवाराचा पुढाकार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
Patur Umale family's

पातुरचीं स्मशानभूमी फुलझाडानी बाहरली सौंदर्यकरणासाठी उमाळे परिवाराचा पुढाकार

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील

BLOG: उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर 'मातोश्री'वरचा फोन खणाणला, अन्...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.