• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राजकारण

Devendra Fadnavis : मुखवटा काढा आणि मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करा; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Devendra Fadnavis On CM Uddhav Thackeray : सरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी पडेल ते कळणारही नाही, फडणवीस यांनी साधलाा निशाणा.

Our Media by Our Media
October 16, 2021
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
99 3
0
Devendra Fadnavis : मुखवटा काढा आणि मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करा; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
20
SHARES
725
VIEWS
FBWhatsappTelegram

शुक्रवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान (Dasara Melava 2021) उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि शिवसैनिकच मुख्यमंत्री बनेल याचा पुनरूच्चार केला. यावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. “दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत, आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

“सरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही. कामं करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा, तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही मदत करून दाखवा,” असं फडणवीस यावेळी म्हणाले. “काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाकारलं नाही. काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आहे आणि शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले. जनतेसोबत बेईमानी करत हे सरकार स्थापन केलं आहे,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

किती वेळा म्हणणार…

“दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत, आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री होण्याची होती हे मान्य करा. राजकारणात महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. परंतु त्याच्या मागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं आणि तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते. देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जर मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर राणेंना का पक्षाच्या बाहेर जांवं लागलं. राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं. त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

Tags: CM Devendra Fadanvisuddhav thakre
Previous Post

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

इन्कम टॅक्सच्या छाप्यांमध्ये १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; अनेक कनेक्शन उघड

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
income-tax-office

इन्कम टॅक्सच्या छाप्यांमध्ये १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; अनेक कनेक्शन उघड

Nawab malik

NCB vs Nawab Malik: कोण आहे फ्लेचर पटेल?; मंत्री नवाब मलिकांचा NCB अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.