अकोला: दि.१२: केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराकरीता www.ncawcd.nic.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार असून अंतिम मुदत शुक्रवार दि. १५ आहे. पात्र व इच्छुकांनी अर्ज करावे,असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.
बाल शक्ती पुरस्कार : वय वर्षे पाचपेक्षा अधिक व १८. शिक्षण, कला व सांस्कृतीक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्य पूर्ण कामगिरी केलेले.
बाल कल्याण पुरस्कार : १) व्यक्तिगत पुरस्कार : मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतुन किमान सात वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
२) संस्थास्तरावर : बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पुर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबुन नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.