तेल्हारा (शुभम सोनटक्के): भारतात लटीयाल भवानीचे दोन शक्तिपीठ असुन राजस्थान येथील फलोदी येथे तर दुसरे शक्तिपीठ महाराष्ट्र येथील तेल्हारा येथे आहे. मंदीराचे पुराणात ४०० वर्षा अगोदरचे आहे. भवानीच्या दर्शनाला महाराष्ट्रा सह विविध राज्यातुन भाविक दर्शना करीता येतात. इच्छेला पावनारी आई लटीयाल भवानी भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात मंदीरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होतात.
या मंदीराचे देखरेख वारसा वैष्णव परीवारा कडे आहे. सद्या अश्वीन शुल्क पक्ष शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होत आहे.
मंदीरामध्ये लटीयाल भवानी मर्तिचे अभीषेक महाआरती नैवेद्य करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो मंदीर हे पुरातन असल्याने बांधकाम जिर्नझाल्याने यावर्षी मंदिराच्या छताचे व चौकोनी भितिंचे काम मंदीराचे महंत प्रविणदास वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले. छताचे व भितिंचे बाधकाम केल्याने मंदीराचे आकर्षण ठरत आहे.
तेल्हारा शहरात वैष्णव बैरागी याची सातवि पीढि लटीयाल भवानी मंदीराची नित्य पुजा अर्चना अखंड नंदादीप प्रज्वलन अश्विन शुल्क प्रतिपदेचि घटस्थापना नउ दीवस भवानीची आराधना नैवध्यार्पन व कार्तिक शुक्ल नवमिचे अन्नकुट इत्यादी धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात. भवानी मंदीराचे महंत स्व.कीशोरदास महाराज वैष्णव याचे पुत्र महंत प्रविणदास वैष्णव सहपरिवार यांच्या मार्गदर्शनात व देखरेखीत लटीयाल भवानी मंदीरातील नवरात्रिचे व दैनंदिन कार्यक्रम पार पडतात.