• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

kolhapur Khebwade murder : नवरात्री मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा खून

Our Media by Our Media
October 9, 2021
in राज्य, गुन्हा
Reading Time: 1 min read
136 5
0
kolhapur-murder
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

कोल्हापूर : नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असतानाच मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना करवीर तालुक्यात खेबवडे (kolhapur Khebwade murder) येथे शनिवारी मध्यरात्री घडली. वैभव साताप्पा भोपळे (वय 25, रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हल्लेखोर सुरज सातापा पाटील (वय 25 रा. खेबवडे) हा शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. नवरात्र काळात ही घटना घडल्याने खेबवडे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव, जिल्हा विशेष पथकाचे तानाजी सावंत, इस्पुरलीचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा मध्यरात्रीच खेबवडे येथे दाखल झाला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

kolhapur Khebwade murder : किरकोळ कारणातून

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी सांगितले की, खेबवडे येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवशंभु तरुण मंडळाच्या वतीने यंदा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे मध्यवर्ती चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याऐवजी चौका लगत असलेल्या मंगल कार्यालयात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री देवीची आरती झाल्यानंतर मंडळाचे सर्व कार्यकर्ते चौकात थांबले होते.

यावेळी सुरज पाटील तेथे आला. यंदा नवरात्र उत्सवासाठी माझी लाइटिंग का घेतले नाही, असा सवाल त्‍याने केला. त्‍याची कार्यकर्त्यांसोबत वादावादी झाली. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने नवरात्र महोत्सव होत असल्याने पुढील वर्षी पाहू, असे सांगून कार्यकर्त्यांनी सुरज याची समजूत काढली. तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नवरात्र उत्सव सोहळ्यासाठी पुढाकार घेणारा वैभव भोपळे याच्याशी संशयिताने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्‍ये शाब्दिक वादावादी झाली. संशयित आराेपी सुरज पाटील हा वैभव भोपळे याच्या अंगावर धावून गेला. धारदार चाकूने पोटावर आरपार वार केल्याने वैभव जमिनीवर कोसळला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचारापुर्वीच तरुणाचा मृत्यू

उपचारापूर्वीच वैभव भोपळे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. तरुणाचा खून झाल्याचे समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली. तणावपूर्ण वातावरणात सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित सुरज पाटील पोलिसांना शरण आला. खबरदारीचा उपाय म्हणून खेबवडे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आल्याने शनिवारी खेबवडे येथील वातावरण निवळले आहे, असेही पाेलिस सूत्रांनी सांगितले.

Tags: Kolhapurkolhapur Khebwade murderMurder
Previous Post

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

विधीमंडळाच्या रोजगार हमी समितीचा सोमवारपासून (दि.११)जिल्हा दौरा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
रोजगार हमी समितीचा

विधीमंडळाच्या रोजगार हमी समितीचा सोमवारपासून (दि.११)जिल्हा दौरा

nima arora collector jilhadhikari akola

मिशन कवच कुंडलः विशेष लसिकरण मोहिमेसाठी जिल्‍हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.