अकोट: (देवानंद खिरकर)– श्रमिक कामगार संघटना व रक्ताचं नातं ग्रुप, NCC विभागा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 रोजी अकोट येते. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी कॉलेज दर्यापूर रोड अकोट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन एन.सी.सी. विभाग व रक्ताचं नातं ग्रुप महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना अकोला यांच्या वतीने केले होते. यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेषता माजी सैनिक (कॅप्टन) मुलींनी सुद्धा रक्तदानात सहभाग घेतला होता. कोरोणाच्या काळामध्ये अनेकांना रक्तासाठी आपले प्राण गमावले होते.
भविष्यात पुढे रक्ताची कमतरता भासू नये याकरिता श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट, एन. सी. सी. विभाग व रक्ताचं नातं ग्रुप महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना अकोला वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी खोटकर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, अकोट शहर चे उपनिरीक्षक पी. एस. आय. राजेश जवसे, अकोट ग्रामीण ठाणेदार नितीन देशमुख, कॅप्टन सुनील डोबाळे, शिवाजी कॉलेज चे प्राचार्य ए.एल. कुलट, शिवाजी शाळेचे मुख्याध्यापक अतुल म्हैसने, एस. पी. वाघ, एन.सी.सी. प्रमुख श्री पी आर ठाकरे, सरपंच तुषार आढाऊ, अविनाश गावंडे, योगेश लबडे, पत्रकार लोकमत विजय शिंदे, कमलेश राठी, नरेंद्र कोंडे, देवानंद खिरकर, पवन बेलसरे, शेखर बेंडवाल मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रक्त संकलित करासाठी सरकारी रक्तपेढी अकोला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रवीण बोंद्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता विजय गावंडे, यश मर्दाने, अक्षय पाटील हे होते.