अकोट : अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या नितीन देशमुख यांनी आपल्या हद्दीत कुठलेही अवैध धंदे जुगार, दारू आढळून आल्यास त्याला सर्वस्वी बिट जमदार जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध वरिष्ठांना तक्रार करून कारवाई करणार असल्याचे प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
अनेकदा अवैध धंद्यातून मिळणारी रसद ही गुन्हेगारीला खतपाणी घालते. त्यातूनच गुन्हेगारी वाढताना दिसून येते आहे. त्यामुळे आक्रमक भूमिका घेत अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांनी इशारा दिला आहे. तसेच ग्रामीण भागात कुठलेही अवैध धंदे सुरू असल्यास ग्रामस्थांनी सरळ ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क करून याबाबत तक्रार केल्यास तात्काळ कारवाई करणार असल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले. आज ग्रामीण पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या कारवाई करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.