अकोला दि.29 : महिला व बालविकास विभाग व राधाकिसन तोष्णीवाल आर्युवेदीक वैद्यकीय महाविद्यालयच्यावतीने जागृती शासकीय महिला राज्यगृह संस्थेतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन मंगळवारी (दि.28) रोजी पार पडले.
या शिबीरात आरोग्य तपासणी, आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेविषयी महिलांना मार्गदर्शन, त्यांच्या समस्यांचे निराकरण, तपासणी सोबतच आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने महिला राज्यगृहात आधारकार्ड शिबीर, कोविड लसीकरण व आरोग्य तपासणी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या आयोजनासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, सुनिल लाडुलकर, स्ञी रोग विभाग प्रमुख डॉ. मनिषा देवकाते, शासकीय महिला राज्यगृह संस्थेचे अधीक्षक रायबोले, सुरज तिवारी, चोमडे यांनी परिश्रम घेतले.