• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

नाशिक पाऊस : दीडशे क्विंटल कांद्यासह गहू भिजला, ४ लाखांचे नुकसान

Our Media by Our Media
September 29, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
93 1
0
नाशिक पाऊस : दीडशे क्विंटल कांद्यासह गहू भिजला, ४ लाखांचे नुकसान
14
SHARES
668
VIEWS
FBWhatsappTelegram

गोंदेगाव : नाशिक पाऊस:  निफाड पूर्व भागातील गावांमध्ये काल मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले. गोई नदीच्या उगमस्थानापासून पाऊस बरसत आहे. त्यामुळे गोई नदीने रुद्ररुप धारण केलेले आहे. दरम्यान, पावसामुळे दीडशे क्विंटल कांद्यासह गहू भिजला आहे. भरवस येथील लेंडी नाल्याने पातळी ओलांडली. त्यामुळे नवनाथ चौधरी या शेतकऱ्याच्या घरात पुराचे पाणी शिरले. (नाशिक पाऊस) येथील पंचवीस क्विंटल गहू, रासायनिक खते, आणि दीडशे क्विंटल कांदे भिजले.

साठविलेल्या ठिकाणी या पाण्याने अंदाजे चार लाख रुपयांचे प्राथमिक नुकसान झाले आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की चाळीतील कांदे वाहून गेले. चौधरी यांनी प्रसंगवधान राखत जनावरे सोडून दिली. कुटुंबासह सुरक्षित आसरा शोधला. महसूल विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

दरम्यान, गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून समुहातील धरण भरल्याने त्यातून विसर्ग वाढला आहे. चणकापूर व पुनद धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. या हंगामातील गिरणा नदीचा सर्वात मोठा पूर ठरणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२४२७ दलघफू क्षमतेच्या चणकापूर धरणात ९७ टक्के, तर १३०६ दलघफू क्षमतेच्या पूनद धरणात ९८ टक्के जलसाठा मर्यादित करुन मंगळवारी रात्री ११ वाजता अनुक्रमे ८८८८ व ३८०० क्यूसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला.

या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठेंगोडा बंधाऱ्यावरुन सुमारे १२ हजार क्यूसेक इतका फ्लो राहण्याची शक्यता आहे. बुधवारी पहाटे २ वाजता ही परिस्थिती असेल. तेथून मालेगावातील गिरणा पुलापर्यंत हे पुराचे पाणी पहाटे पाच वाजेपर्यंत येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार सी आर राजपूत यांनी दिला आहे.

Tags: nashikonion lossrain
Previous Post

Marathwada rain update मराठवाड्यावर आभाळ फाटले! आठही जिल्ह्यांत शेतांचे झाले तळे

Next Post

बापरे! डॉक्टरनं महिला रुग्णाला पाहून म्हटलं ‘सुंदर’; भडकलेल्या पतीनं ‘असं’ काही केलं की…

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Crime

बापरे! डॉक्टरनं महिला रुग्णाला पाहून म्हटलं 'सुंदर'; भडकलेल्या पतीनं ‘असं’ काही केलं की...

कुरिअरमधून १५ लाखांची हवाल्याची राेकड हस्तगत

कुरिअरमधून १५ लाखांची हवाल्याची राेकड हस्तगत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.