अकोला: विधी व न्याय क्षेत्रात लोकांना विनामूल्य मार्गदर्शन व्हावे तसेच पैसा नाही म्हणून कोर्टविषयक लहान सहान कामे थांबू नयेत. म्हणून आज अकोल्यात प्रहार विधी आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदावर ऍड. रवींद्र पोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येथील शासकीय विश्राम गृहावर आज दुपारी प्रहार जिल्हाध्यक्ष ऍड.सुधाकर खुमकर यांच्या पुढाकारात शहरातील 15 वकिलांनी प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पार्टीत प्रवेश केला.
रवींद्र पोटे, नागेश म्हसाये, सागर महल्ले, हरीश काटोले, सुरेश खरडे, राजपाल पळसपगार, मोहन सरदार, सुनील पळसपगार, अनिल निखाडे, दिनकर बुंदे, अभिषेक देशमुख, भूषण जुमले, संतोष पवार, भास्कर मोडक या वकिलांचे प्रहार जनशक्ती पार्टीमध्ये गावंडे यांनी स्वागत केले. यावेळी प्रहार प्रदेश सरचिटणीस पुरुषोत्तम आवारे पाटील, जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, महानगर अध्यक्ष मनोज पाटील, मुन्ना बिहाडे, दिलीप पिवाल, गोपाल जलमकर, संतोष टाले, ओम पाटील इत्यादी उपस्थित होते.
मोफत कायदे मार्गदर्शन करू..
प्रहार विधी आघाडीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पोटे यांनी यावेळी प्रत्येक तालुक्यात प्रहार विधी आघाडी कडून लोकांना मोफत कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात येणार असून लवकरच आणखी 100 तरुण वकील प्रहार मध्ये प्रवेश करून ना. बच्चूभाऊ कडू याना अपेक्षित समाजसेवा करतील अशी ग्वाही दिली.