मुंबई: अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) याच्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
सोनू सूदची (Sonu Sood) नुकतीच दिल्ली शालेय शिक्षणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड झाली. या सुडातून सोनू सूदवर कारवाई केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याशी सलगी वाढल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
राऊत पुढे म्हणाले, सोनू सूदने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. देशात लॉकडाऊन पडल्याने देशभरातून मजूर रस्त्यावरून जात होते. यावेळी सोनू सूदने मजुरांना बसेस, रेल्वे, विमान तिकिटे बुकिंग केली होती. याच सोनू सूदचे भाजपने कोरोना काळात कौतुक करत होते. त्याच्यावरच आज हे छापा टाकून दबाव टाकत आहेत. सीबीआय मागे लावण्याचे काम करत आहेत.










