नवी दिल्ली : अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यातील घडामोडींवर सर्व जगात लक्ष वेधलं असताना सौदी अरेबियाने (Saudi Arabia) मात्र त्यावर अजूनही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण, आता सौदी अरेबियाकडून प्रतिक्रिया आलेले आहे. ते म्हणतात, “आम्हाला आशा आहे की तालिबान नवं सरकार व्यवस्थितपणे चालवू शकेल आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता व स्थिरता स्थापन करू शकेल”, अशी प्रतिक्रिया सौदीने तालिबान्यांसदर्भात दिलेली आहे.
मात्र, सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) तालिबानी संदर्भात कोणती भूमिका असेल किंवा त्यांच्या नव्या सरकारला मान्यता दिली जाईल की नाही, यासंबंधी सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिंस फैसल बिन फरहान अल सऊद यांनी यासंबंधीचं वक्तव्य केलेलं नाही. ते राजधानी रियादमधील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रिंस फैसल म्हणाले की, “आम्हाला आशा आहे की, तालिबानी सरकार हे अफगाण लोकांच्या हितासाठी काम करेल आणि बाहेरील देशांचा हस्तक्षेप बंद करेल. तालिबानी सरकार हिंसा, अराजकता संपवून सर्वांना सुरक्षा प्रदान करेल”, अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी काबूलमधील हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांप्रती संवेदना व्यक्त केली.
“आम्ही अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करतो. या कठीण काळात अफगाणिस्तानला पुन्हा उभं करण्यासाठी सौदी अरेबिया नेहमीच मदत करत राहील”, असंही प्रिंस फैसल यांनी सांगितलं. हे लक्षात घ्यावं लागेल की, १९९६ ते २००१ पर्यंत तालिबान शासनादरम्यान पाकिस्तान, संयुक्त अरबअमीरातनंतर सौदी अरब हा तिसरा देश होता, ज्याने तालिबान सरकारला मान्यता दिली होती.