• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पशुवैद्यक हत्या प्रकरण : ‘आरोपी नाही सापडला तर नोकरी सोडून देईन’

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
236 2
0
पशुवैद्यक हत्या प्रकरण : ‘आरोपी नाही सापडला तर नोकरी सोडून देईन’
35
SHARES
1.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

धुळे : पशुवैद्यक हत्या प्रकरण : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे नजीक एका पशुवैद्यकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. पण रात्रीच पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी आंदोलकांसमोर आरोपीला अटक करण्यात दिरंगाई झाल्यास पोलिस सेवेतून राजीनामा देईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. पशुवैद्यक हत्या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले आहेत.

दरम्यान, रात्री उशिरा यातील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथे राहणारे प्रेमसिंग गिरासे हे पशुवैद्यक म्हणून काम करत होते. शिंदखेड्याच्या पशू रुग्णालयात ते सेवा देत होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

यासाठी त्यांना दराणे ते शिंदखेडा पर्यंत दररोज ये जा करावे लागत असल्याने त्यांनी पोळ्याच्या मुहुर्तावर नवीन दुचाकी खरेदी केली. शिंदखेडा येथून ही नवीन दुचाकी घेवून ते सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाले. पण चिमठाणे गावाजवळील विश्रामगृहाजवळ त्यांना तिघा तरुणांनी अडवून त्यांची दुचाकी हिसकावण्याचा प्रयत्न सुरु केला. याला प्रेमसिंग गिरासे यांनी मज्जाव करताच या चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.

यावेळी गिरासे यांनी मदतीसाठी आवाज दिल्यानंतर तिघा मारेकऱ्यांनी पलायन केले. यावेळी नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सोनगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गिरासे यांच्या मृत्यूमुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. स्थानिक पोलिसांनी या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु केला. पण त्यांना यश येत नसल्याची माहिती कळाल्याने पेालिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्यासमवेत संवाद साधला.

तरुण गिरासे यांच्या मृत्यूचे मला देखील दु:ख आहे. रस्त्यावर गुन्हा करणाऱ्यावर कारवाई करण्याची तसेच त्यांच्यावर जरब बसवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. यातील आरोपी लपले असतील तरीही त्यांना शोधून काढेन. हे आरोपी सापडले नाही तर नोकरी सोडून देईन, अशा शब्दांत पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

यानंतर रात्री उशीरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक पंडीत यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने हालचाली करीत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Tags: Crimenashik
Previous Post

भोंदू मामा कडून भक्तांची लूट! राजकीय आश्रयामुळे दुकानदारी फोफावली

Next Post

म. ए. समितीला बेळगाव महापालिकेची सत्ता का गमवावी लागली?

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
म. ए. समितीला बेळगाव महापालिकेची सत्ता का गमवावी लागली?

म. ए. समितीला बेळगाव महापालिकेची सत्ता का गमवावी लागली?

parambir-singh-

परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.