पातूर : (सुनिल गाडगे): पातुर शहरात शनिवारी आठवडी बाजार भरत असतो. कोवीळ या माहामारीमुळे आठवडी बाजार हा बंद करण्यात आला. परंतु गेल्या सहा महीण्यापासुन हा आठवडी बाजार संभाजी चौक पातुर व बाळापुर महामार्गावर भरतो. या बाजाराला कोणतेही आठकाठी प्रशाषनाने लावली नाही .प्रत्येक शनिवारला वाहनाची मोठी कोंडी होते वाहतुक विष्कळीत होते. लहान मोठे वाद होतात.किरकोळ अपघात झाले. एकीकडे कोट्यावधी खर्च करुन बांधलेला आठवडी बाजार ओस पडला आहे.संभाजी चौकातच आठवडी बाजार राहवा या करीता काही सुज्ञ हे प्रयत्नशील आहे या मागे मोठे आर्थीक बाब असल्याचे बोलले जाते.शनिवारला संभाजी चौकात प्रंचड कोंडी होत असल्याने स्थानीक नागरीकांना अनेक रोषाला समोर जावे लागत आहे .या आठवडी बाजार भरविण्याच्या शाषना कडुन लेखी सुचना अद्याप पर्यत आल्या नाहीत .परंतु गावगाडा चालविण्यासाठी प्रशाषनाने दुर्लक्ष केले. परंतु या दुर्लक्षामुळे पातुर वासियावर किरकोळवादतुन मोठा अनर्ध घडला तर याला जवाबदार कोण राहील ? या बाबत तहसिलदार , मुख्यधीकारी , शिर्ला ग्राम, पंचायत सचीव . यानी आपली जवाबदारी झटकली आहे .तिनही विभागाचे समन्वय नसल्याने संभाजी चौकात , भर मुख्य मार्गावर आठवडी बाजार भरत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधीकारी यांनी जातिने लक्ष देणे गरजेचे आहे.