अकोला,दि.28- राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा. ज.मो. अभ्यंकर हे शनिवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.28 रोजी सकाळी पावणेसहा वाजता मुंबई येथून अकोलाकडे आगमन. सकाळी नऊ वाजता अल्पसंख्याक समुदायातील व्यक्ती व शैक्षणिक संस्था यांच्या तक्रारीबाबत सुनावणी, सकाळी 11 वाजता प्राप्त तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा व उपाययोजना. दुपारी 12 वाजता राखीव. दुपारी एक वाजता अकोला येथुन अंजनगावकडे प्रयाण.