• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

बापरे! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा दिली; पेटत्या निखाऱ्यांवरून सून चालली; Video व्हायरल

Daughter in law agnipariksha due to mother in law : सासूच्या टोमण्यांना वैतागून एका सुनेने अग्निपरीक्षा दिली आहे. पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.

Our Media by Our Media
August 25, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
180 2
0
बापरे! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा दिली
27
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : देश सध्या कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. सासूच्या टोमण्यांना वैतागून एका सुनेने अग्निपरीक्षा दिली आहे. पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती चक्क पेटत्या निखाऱ्यांवरून चालली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर परिसरात ही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

सासूच्या टोमण्यांना वैतागलेल्या सुनेने अखेर सासूच्या छळापासून मुक्ती हवी म्हणून पेटत्या निखाऱ्यांवरून चालत अग्निपरीक्षाही दिल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक दिवसांपासून सासू आणि सुनेचं पटत नव्हतं. त्यांच्यामध्ये छोटे मोठे वाद हे नेहमीच होत होते. आपल्या मुलाला काहीतरी खायला घालून सुनेने वश केलं आहे, असा आरोप सासूने केला. यावरून ती सुनेला सतत टोमणे मारायची. दररोजच्या या कटकटीला सून इतकी वैतागली की अखेर यातून मुक्ती मिळवण्यासाठी ती भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

भोंदूबाबाने सुरुवातीला धर्मग्रंथावर सुनेला हात ठेवायला सांगितला. तिच्या सासूला ती निर्दोष आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण सासू काही ऐकायला तयार नाही. ती तरी देखील सुनेला टोमणे मारत असे. मग भोंदूबाबाने महिलेला अग्निपरीक्षेचा मार्ग सांगितला. सुनेला पेटत्या निखाऱ्यावर चालत आपण निर्दोष आहोत हे सर्वांसमोर सिद्ध करायला सांगितलं. सासूच्या रोजच्या छळाला सून इतकी कंटाळली होती की ती त्यातून आपली सुटका व्हावी म्हणून ती चक्क पेटत्या निखाऱ्यांवर चालायला देखील तयार झाली. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली.

महिलेचं कुटुंब, नातेवाईक, शेजारी, ग्रामस्थ हे सुनेला पाहण्यासाठी जमा झाले. जमिनीवर पेटते निखारे ठेवण्यात आले. त्यावरून आधी भोंदूबाबाने चालण्याचं नाटक केलं. त्यानंतर त्याने त्या महिलेला त्याच्यावरून चालायला सांगितलं. महिला एकदा नव्हे तर दोनदा या निखाऱ्यांवरून चालली. मोठ्या संख्येने लोक हा धक्कादायक प्रकार पाहत होते. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेक जण यावर टीका करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Tags: crime newsmadhay pradesh
Previous Post

शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या सिंधूदुर्गातील बंगल्यावर हल्ला

Next Post

इन्स्टाग्राम बंद करणार ‘हे’ लोकप्रिय फीचर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
Instagram

इन्स्टाग्राम बंद करणार ‘हे’ लोकप्रिय फीचर

Narayan Rane

नाशिक पोलीस : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावली नोटीस

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.