सिंधूदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि जामीन झाल्यानांतर आता महाराष्ट्रात दुसऱ्या राजकीय नाट्याला प्रारंभ झाला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या सिंधूदुर्गातील बंगाल्यावर हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
राणे यांना दुपारी तीन वाजता संगमेश्वर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर महाड पोलिसांनी त्यांना अटक केली. रात्री उशिरा त्यांना रायगड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
दरम्यान दिवसभर राणे यांच्या अटकेचे आणि मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले.
शिवसैनिकांनी राज्यभर उग्र निदर्शने करू राणे यांचा निषेध केला.
कोकणात वातावरण तणावपूर्ण होते. राणे महाड पोलिस ठाण्यात असताना तेथे दोनशेहून अधिक वाहने थांबून होती. राणे समर्थक आक्रमक झाले होते. राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर तणावर निवळला.
राणे यांनी वक्तव्य केल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी त्यांची पंतप्रधान कार्यालयाकडे थेट तक्रार केली होती.
राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाने तक्रारीची दखल घेत राऊत यांना फोन केला.
तसेच पंतप्रधानांना वेळ नसल्याने याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून घेण्याबाबत सांगितले.
त्यामुळे राणे समर्थकांचा राऊत यांच्यावर रोष होता. राऊत यांनी राणे यांच्यावर मंगळवारी सकाळपासून कडवी टीका केली होती. त्याचे पडसात मंगळवारी रात्री उमटले.
राऊत यांचा सिंधूदुर्गातील तळगाव येथे बंगला आहे. या बंगल्यावर रात्री अज्ञातांना सोड्याच्या बाटल्या आणि दगडफेक केली.
चौघा हल्लेखोरांनी बाटल्या फेकून पोबारा केला. यात बंगल्याचे नुकसान झाले नसले तरी परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
खबरदारी म्हणून पोलिसांनी रणनीती आखली
मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी निदर्शने केली.
रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे. राणे यांचे स्वागत फलक तोडण्यात आले.
राणे यांनी चिपळूण येथून रत्नागिरीच्या दिशेने प्रयाण केले. त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे अटक होईल, असे सांगण्यात येत होते.
रत्नागिरीमध्ये जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी आदी शिवसेना नेते आले होते.
त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. दरम्यान नियाजनांच्या बैठकीतील एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.