• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 25, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home मनोरंजन

‘सैराट’च्या ‘आर्ची’ची मोठी झेप, अभिनेत्री रिंकू राजगुरू दिसणार नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात!

अभिनेत्री रिंकू राजगुरू नेटफ्लिक्सच्या आगामी ‘अनकही कहानिया’ (Ankahi Kahaniya) या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच तिच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या या चित्रपटामध्ये प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

Team by Team
August 18, 2021
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
210 3
0
Rinku Rajguru
50
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : 2016मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने अफाट प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्र अजरामर झाले. या चित्रपटातील ‘आर्ची’ अर्थात मुख्य नायिका रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिला या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून अभिनेत्रीने असे नाव कमावले की, आजही तिला या चित्रपटासाठी विशेष ओळखले जाते. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आर्ची आणि परश्या या जोडीने सर्वांच्या हृदयावर राज्य केले. रिंकू राजगुरूने सिनेमाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आता रिंकू राजगुरू आणखी एक मोठी झेप घेत आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू नेटफ्लिक्सच्या आगामी ‘अनकही कहानिया’ (Ankahi Kahaniya) या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच तिच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

 

नेटफ्लिक्सचा नवा चित्रपट

नेटफ्लिक्सच्या या चित्रपटामध्ये प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. यातील एका कथेत रिंकू राजगुरु झळकणार आहे. अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी या चित्रपटातील कथांसाठी दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबतच या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. रिंकू राजगुरू हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती शेअर केली आहे. रिंकू या पोस्टमध्ये लिहीते की, “या मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपी गोष्ट नाही. अश्याच प्रेमाची अनकही कहानिया लवकरच नेटफ्लिक्सवर 17 सप्टेंबरला येत आहे.”

‘200 हल्ला हो’मध्ये झळकणार मुख्य भूमिकेत!

ZEE5ने गुरुवारी आपला आगामी चित्रपट ‘200 – हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज केला. 200 Halla Ho हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अभिनेता बरुण सोबती आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. व्हर्च्युअल कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘200 हल्ला हो’ हा एक अतिशय गंभीर समस्येवर भाष्य करणारा चित्रपट आहे. ही घटना कित्येक वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा 200 दलित महिलांनी एकत्रितपणे कायदा आणि न्याय हातात घेतला होता. या चित्रपटात ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कशी आहे रिंकूची भूमिका?

या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना रिंकू म्हणाली की, ‘ही एक अशी मुलगी आहे, जी स्वतः एका दलित कुटुंबातून पुढे आली आहे. तिने वर्षानुवर्षे स्त्रियांवर होणारा अत्याचार पाहिला आहे. इतका अत्याचार सहन करूनही या स्त्रीया गप्प का बसतात, असा प्रश्न तिला नेहमीच पडत असतो. आता ही मुलगी स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे. इतकंच नाही तर या स्त्रियांच्या आणि आपल्या हक्कासाठी जोरदार लढा देणार आहे, अशी लढाऊ आशा साकारताना मला देखील खूप छान वाटलं.’

Tags: Rinku RajguruSairat
Previous Post

..अन् स्वतःच्या हातानं कपडे काढत पूजेत नग्नावस्थेत बसवलं; तरुणीवरील अत्याचाराची घटना

Next Post

खूशखबर; मुलींना एनडीएमध्ये प्रवेश देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”
Featured

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

September 11, 2024
सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…
Featured

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

August 13, 2024
दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च
Featured

दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च

August 6, 2024
ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर
Featured

ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर

April 1, 2024
शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई
Featured

शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई

March 14, 2024
Next Post
UPSC_NDA

खूशखबर; मुलींना एनडीएमध्ये प्रवेश देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

Telhara News

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तेल्हारा तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने विर मातांचा सन्मान सोहळा संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.