जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर “धर्मवीर – २” या चित्रपटात उलगडणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबरला रोजी प्रदर्शित होणार आहे.
“धर्मवीर -२” या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या यापूर्वी प्रदर्शित केलेल्या टीजर, ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची गाणीही गाजत आहेत.
धर्मवीर २ ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस
धर्मवीर २ चा एक नवा ट्रेलर लाँच झाल्यानंतर प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी “धर्मवीर -२” मधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
नव्या ट्रेलरमधून दिघेसाहेबांची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघे या गाण्यात दिसतात. त्याशिवाय हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाविषयी थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे दिघे यात दिसतात. म्हणूनच आता चित्रपटात काय कथानक उलगडणार याच कुतुहल निर्माण झाले आहे.