• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home मनोरंजन

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या घरी साजरा झाला आगळावेगळा वाढदिवस

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या घरी असा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला.

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 6, 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
104 1
0
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या घरी साजरा झाला आगळावेगळा वाढदिवस
30
SHARES
747
VIEWS
FBWhatsappTelegram

प्रशांत शर्मा / शिर्डी : आतापर्यंत आपण आपल्या मुलांचे वाढदिवस तसेच आपल्या वाडवडिलांची वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करताना पाहत आलो आहोत.आपल्या कार्याने जगभर प्रसिद्ध असलेल्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या बाळू नावाच्या कुत्र्याचा नुकताच वाढदिवस साजरा केला. (Padma Shri Rahibai Popere celebrated the dog’s birthday)

लहान मुलांवर वाघाचा होणारा हल्ला थोपवला होता
वाढदिवस साजरा करण्याचे विशेष कारण म्हणजे गेली दहा वर्ष बाळू पद्मश्री राहीबाई यांना वेळोवेळी साथ देत आलेला आहे. अनेकदा त्याने घरातील लहान मुलांवर वाघाचा होणारा हल्ला थोपवला आहे तसेच तो परतवून लावलेला आहे .त्यामुळे बाळू कुटुंबातील सर्वांचाच अत्यंत लाडका आणि विश्वासू मानला जातो. याच बाळू वर गेल्या सहा महिन्यात पाच वेळा बिबट्याने हल्ला केल्याचे समजते. नुकतेच बाळूला बिबट्याने आपले लक्ष्य बनवले होते. बाळूला पकडून रात्रभर जंगलात घेऊन गेल्यानंतर बाळू बरोबर झालेली झुंबड व त्यातून बाळूने आपले प्राण वाचतात आपली मालकीण पद्मश्री राहीबाई यांचे घर पुन्हा गाठले.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

रात्रभर वाघाच्या ताब्यात असलेला बाळू सुखरूप घरी आल्याचे बघून कुटुंबातील सर्व सदस्यांना अत्यंत आनंद झाला. दहा वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे दिलेली सेवा व अनेकदा बिबट्याने हल्ला करूनही आपले व कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवलेल्या बाळू बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य सरसावले. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत बाळूला मिळालेल्या जीवदानाचा आनंद त्याचा वाढदिवस साजरा करत व्यक्त केला.

पद्मश्री राहीबाई अत्यंत भावूक
सर्वप्रथम बाळूला स्वच्छ आंघोळ घालण्यात आली त्यानंतर त्याची पूजा करून अगदी लहान बाळाचा वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे घरात सजावट करून बाळू सह केक कापण्यात आला . घरातील आबालवृद्धांना बाळूसह केक भरवण्यात आला. याप्रसंगी बाळुला गेले दहा वर्ष पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणार्‍या पद्मश्री राहीबाई यांनी त्याची विधिवत पूजा करून आपल्या लाडक्या बाळूला केक आणि स्वतःच्या ताटातील जेवण भरवले. याप्रसंगी पद्मश्री राहीबाई अत्यंत भावूक झाल्या होत्या आणि बाळु मूळे आपले स्वतःचे दोनदा प्राण वाचलेले आहेत हा प्रसंग त्यांनी उपस्थित सर्वांना आठवणीने सांगितला. माणसांचे वाढदिवस साजरे करताना आपण सर्वत्र बघतो परंतु एखाद्या प्राण्याविषयी कुटुंबाचे प्रेम आणि जवळीक किती घट्ट असते हेच या प्रसंगातून दिसून येते.

Tags: celebrated the dog's birthdayDog Birthdaydog's birthdayPadma Shri Rahibai PopereRahibai Popere
Previous Post

BREAKING – राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू होणार, शिक्षण विभागाचा विचार

Next Post

निकृष्ठ दर्ज्याचे शिळे शिवभोजन देणाऱ्या केंद्राची मान्यता रद्द करा शिवसेना युवासेनेची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे मागणी

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”
Featured

काहीच दिवस बाकी..! यादिवशी प्रदर्शित होणार “धर्मवीर-२”

September 11, 2024
सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…
Featured

सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने पातुर शहरात निघाली भव्य कावड यात्रा…

August 13, 2024
दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च
Featured

दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला “नवरा माझा नवसाचा 2”, नवे पोस्टर लॉन्च

August 6, 2024
ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर
Featured

ग्रामीण जीवन होतेय प्रभावीपणे चित्रीत पातूरचा बाल कलावंत राघव गाडगे कलर्स मराठीवर

April 1, 2024
शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई
Featured

शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई

March 14, 2024
Next Post
निकृष्ठ दर्ज्याचे शिळे शिवभोजन देणाऱ्या केंद्राची मान्यता रद्द करा  शिवसेना युवासेनेची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे मागणी

निकृष्ठ दर्ज्याचे शिळे शिवभोजन देणाऱ्या केंद्राची मान्यता रद्द करा शिवसेना युवासेनेची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे मागणी

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, नागपुरमधील NIT कॉलेजवर ईडीचे छापे

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, नागपुरमधील NIT कॉलेजवर ईडीचे छापे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.