• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बुधवारपासून (दि.3) निर्बंधात शिथिलता; अत्‍यावश्‍यक व‍ बिगर अत्‍यावश्‍यक दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु

Team by Team
August 3, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
212 2
0
akola
43
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला-  कोविड-19 विषाणूचा संभाव्य तिसरा टप्पा लक्षात घेवून कोविड विषाणुचे संक्रमण रोखण्याकरीता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लेवल-तीन नुसार लादण्यात  आलेले निर्बंधामध्ये बदल करुन सुधारीत आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अत्‍यावश्‍यक व‍ बिगर अत्‍यावश्‍यक  दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतील. अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता  बुधवार दि. 3 ऑगस्ट पासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी निर्गमित  केले आहेत.

  1.  सर्व प्रकारची अत्‍यावश्‍यक व‍ बिगर अत्‍यावश्‍यक  दुकाने, प्रतिष्‍ठाने, मॉल्‍स सोमवार ते  शुक्रवार  रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतील. तथापि दर शनिवारी अत्‍यावश्‍यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने, प्रतिष्‍ठाने, मॉल्‍स दुपारी तीन या कालावधीत सुरु राहतील.
  2. आठवड्याच्‍या प्रत्‍येक रविवारी अत्‍यावश्‍यक सेवा वगळता बिगर अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारे  आस्‍थापना, दुकाने, प्रतिष्‍ठाने बंद राहतील.
  3. जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप, डीझेल, सीएनजी गॅस पंप नियमितपणे सुरु राहतील.
  4. सार्वजनिक ठिकाणे, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे व्यायाम, चालणे, फिरणे व सायकलींग करिता सोमवार ते रविवार सायंकाळी आठपर्यंत  सुरु राहतील.
  5. सर्व प्रकारची  खाजगी व शासकीय कार्यालये ही 100 टक्के पुर्ण क्षमतेसह सुरु राहतील.  तथापि प्रवासामध्‍ये  गर्दी  टाळण्‍याचे दृष्‍टीने  कार्यालयामध्‍ये  येणा-जाण्‍याच्‍या वेळेमध्‍ये बदल करता येईल.
  6. वर्क फार्म होम सुविधा असलेली कार्यालये यापूढेही  त्‍याच पध्‍दतीने  सुरु  ठेवता येईल.
  7. सर्व प्रकारच्‍या कृषी विषयक सेवा पुरविणारे प्रतिष्‍ठाने, कृषी सेवा केन्‍द्र, सार्वजनिक बांधकामे, उत्‍पादन क्षेत्राशी  निगडीत उद्योग, एमआयडीसी, अत्‍यावश्‍यक सेवा  उद्योग प्रक्रिया व सार्वजनिक वाहतूक व  मालवाहतूक कोविड नियमांचे  पालन करुन नियमितपणे  सुरु राहतील.
  8. जीम, व्‍यायामशाळा, सलुन, ब्‍युटी पार्लर, स्‍पा, योगा केन्‍द्र तसेच शासकीय व खाजगी अभ्‍यासिका ह्या  50  टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत व शनिवारी  दुपारी तीन पर्यंत सुरु राहतील सुरु ठेवता येतील. रविवारी संपूर्णतः बंद राहतील मात्र  अशा ठिकाणी  वार्ताणुकूलीत साहीत्‍यांचा  वापर करता येणार नाही.
  9. सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिगर बॅंकींग वित्‍तीय संस्‍था, सुक्ष्‍म वित्‍त संस्‍था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा, पोस्‍ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था नियमिती वेळेनुसार सुरु राहतील.
  10. सर्व चित्रपटगृह, मल्‍टीप्लेक्‍स थिएटर, नाटयगृह, मनोरंजन केन्‍द्र ही पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
  11. सर्व प्रकारची धार्मीक स्‍थळे, प्रार्थना स्‍थळे, बंद राहतील.
  12. शाळा, महाविद्यालय  सुरु करणे  राज्‍य शासनाचे  शिक्षण विभागाकडून स्‍वतंत्र आदेश  निर्गमित करण्‍यात येतील.
  13. हॉटेल, रेस्‍टॉरेन्‍ट, खानावळ  सोमवार ते शनिवार दुपारी 04.00 वाजेपर्यंत 50 टक्के आसण क्षमतेसह कोविड प्रतिबंधात्मक आदेशांचे  पालन करुन सुरु ठेवता येतील.  त्‍यानंतर केवळ पार्सल सुविधेने  सुरु ठेवता येईल.

त्‍याच प्रमाणे  जिल्‍हयातील बार रेस्‍टॉरेन्‍ट हे  सोमवार ते  शुक्रवार  रात्री आठ वाजेपर्यंत व  शनीवारी  दुपारी तीन वाजेपर्यंत 50 टक्के आसण क्षमतेसह सुरु राहतील.  तथापी शनिवारी दुपारी तीन नंतर व  रविवारी बार, रेस्‍टॉरेन्‍ट  संपूर्णतः बंद राहतील.  (कोणत्‍याही बार रेस्‍टॉरेन्‍ट मधुन होम डिलीवरीची सुविधा राहणार नाही. )सर्व प्रकारच्‍या किरकोळ मद्यविक्री  अनुज्ञप्‍ती  विहीत वेळेनुसार सुरु होवून रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतील.   रविवारी सर्व प्रकारच्‍या अनुज्ञप्‍ती  वाईन शॉप व बार बंद राहतील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

14.संपूर्ण अकोला  शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण  भागामध्‍ये रात्री नऊ ते सकाळी पाच या कालावधीमध्‍ये  संचारबंदी लागू  राहील.  या कालावधीमध्‍ये  कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक कामे वगळता मुक्‍त संचार करण्‍यास मनाई राहील.

  1. गर्दी टाळण्यासाठी,वाढदिवस साजरा करण्यावर लादलेले निर्बंध, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक शिबिरे, रॅली, निषेध मोर्चे  इत्‍यादीसाठी  निर्गमित केलेले  निर्बंध कायम  ठेवण्‍यात येत आहेत.
  2. लग्‍न समारंभाचे आयोजन- मंगल कार्यालये, सभागृह एकूण आसण क्षमतेच्‍या 50 टक्के किंवा 100 व्यक्ती या पैकी जी कमी असेल
  3. अंत्‍यविधी 50 व्‍यक्‍तीच्यामर्यादेत.
  4. संबंधीत आस्‍थापना, दुकाने, प्रतिष्‍ठाने इत्‍यादी ठिकाणी काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्‍यासाठी  प्रतिबंधात्‍मक उपाययोजना अंतर्गत  स्‍वच्‍छता व सार्वजनिक शिस्‍तीचे पालन करावे.
  5. कोविड नियमांचे  उलंघन करणाऱ्या व्‍यक्‍तींवर दंडात्‍मक कारवाई  करण्‍याबाबतचे आदेश यापूढेही कायम राहतील. या बाबत काटेकारपणे तपासणी  व अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संबंधीत  अनुज्ञप्‍ती प्राधिकारी, आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक, महसूल विभाग तसेच  ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालीका, नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्‍याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर, तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील.

वरील आदेश हे बुधवार दिनांक 3 ऑगस्ट 2021 पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्‍हयातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी आदेशात म्हटले आहे.

Tags: Lock down restriction
Previous Post

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या; जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचे आवाहन

Next Post

Tokyo Olympics: कुस्तीत भारताची जोरदार मुसंडी, रवी दहिया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Tokyo Olympics: कुस्तीत भारताची जोरदार मुसंडी, रवी दहिया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक

Tokyo Olympics: कुस्तीत भारताची जोरदार मुसंडी, रवी दहिया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक

पृथ्वी शॉ इंग्लंडला पोहोचला, या 3 खेळाडूंचे टेन्शन वाढले, टीममध्ये परतण्याची शक्यता

पृथ्वी शॉ इंग्लंडला पोहोचला, या 3 खेळाडूंचे टेन्शन वाढले, टीममध्ये परतण्याची शक्यता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.