अकोला (प्रती) : बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायत मध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या अशी मागणी अशोका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम तिडके यांनी केली आहे.
शेळद ग्रामपंचायत मध्ये रस्ते नाल्या नसल्यामुळे लोकांना ये-जा करतानी खूप त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांना या पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत ये जा करावी लागत आहे नाल्या नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत आहे तसेच कचऱ्याचा ही प्रश्न निर्माण झाला आहे कचरा जागोजागी जमा होत आहे त्यामुळे या कचऱ्यामुळे पावसाळ्यात रोगराईला आमंत्रण आहे या कचऱ्याचा दुर्गंध सुटलेला आहे जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत कचरापेट्या लावण्यात याव्यात व या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावे नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अन्यथा शेळद ग्रामपंचायत च्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अशोका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे