तेल्हारा :– तेल्हारा नगर परिषद अंतर्गत सुरु असलेल्या ६ कोटी रुपयांच्या वाढिव व पूरक पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून अंदाज पत्रका मधील सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून सर्रास पने पोकलँड चा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे व नाल्यानचे नुकसान झाले आहे असा प्रकार सुरु असतांना सुद्धा सत्ताधारी गप्प का ? संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे कारण काय अशा प्रकारचा गंभीर आरोप सुद्धा तेल्हारा पालिकेचे विरोधी पक्षनेते मितेश मल्ल यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रारी मधून केला असून कामांन बाबत चौकशी समिति नेमण्याची मागणी केली आहे.
तेल्हारा नगर परिषद च्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या ६ कोटी रुपयांच्या वाढीव पूरक पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याचे दिसून येत असून सदर काम कासवगतीने सुरू आहे शहरांमध्ये नवीन पाईपलाईन किमान सुमारे 22 ते 23 किलोमीटरपर्यंत टाकायची आहे ते टाकताना शहरातील ऑल रेडी सिमेंट रोड हे इस्टिमेट मध्ये नमूद केल्याप्रमाणे ब्रेकर मशीन द्वारे रोड फोड़ावे लागतात परंतु सदर कंत्राटदार यांनी इस्टिमेट मधील अटी व नियम धाब्यावर बसवून स्वतःची मनमानी करून सर्रासपणे पोकलँड मशीन द्वारे रोड फोडलेले आहेत त्यामुळे सिमेंट रोड फोडतांना पोक लँड मशीन ने बऱ्याच ठिकाणी सामान्य नागरिकांच्या नळ धारकांच्या नळजोडणी लोखंडी पाइप तुटलेले आहेत त्यांचे कनेक्शन संबंधित कंत्राटदाराने इस्टिमेट प्रमाणे काम न केल्यामुळे लिहून दिलेल्या करारनाम्या प्रमाणे वरील समस्या स्वखर्चातून करावयास पाहिजे मात्र कंत्राटदाराला त्याचे काही घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे तसेच शहरातील हिवरखेड महामार्गालगत असलेल्या जलकुंभा ला जोड़णारी मुख्य पाण्याची पाईप लाईन ही फक्त एक ते दोन फुटापर्यंतच्या खोलीकरनात टाकलेली दिसत आहे त्यामुळे भविष्यात ही पाईप लाईन फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच वृंदावन कॉलनी लगत नवीन बांधकाम सुरू असलेल्या जलकुंभाच्या कामांमध्ये सुद्धा इस्टिमेट मध्ये नमूद केल्याप्रमाणे काम झाल्याचे दिसून येत नाही त्याचप्रमाणे त्याला जोडणाऱ्या मुख्य पाईपलाईन जोडण्याचे काम बरेच महिन्यांपासून प्रलंबित आहे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच जुने शहरातील एकमेव असलेल्या माळेगाव नाका परिसरातील जलकुंभाला जोडणारी मुख्य पाईपलाईन गेल्या एक वर्षापासून जोडलेली नाही पर्यायाने सदर एरियात पाणी जात नाही ति नवीन पाईपलाईन जोडणे व तिची टेस्टिंग जोपर्यंत घेतल्या जात नाही तोपर्यंत संबंधित एरिया मधील पाईपलाईनचा पाणीपुरवठा प्रत्येकाला होतो किंवा नाही हे कळायला मार्ग नाही करिता त्या मुख्य पाईपलाईन ची जोडणी करून टेस्टिंग घेऊन उर्वरित पाइपलाइनच्या समस्या त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात अशा प्रकारचि जुन्या शहरातील सर्व नागरिकांची रास्त मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. संबंधित कंत्राटदार यांच्या मनमानी व निष्काळजी पूर्वक काम करण्याच्या पद्धतीमुळे नगरपरिषद प्रशासनाची मोठ्या प्रमाणात बदनामी होण्याचे चित्र दिसत आहे तरी सुद्धा व न प मधील सत्ताधारी गप्प बसण्याचे कारण काय आहे हा प्रश्न गुलदस्त्यात आहे त्याच प्रमाणे संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे कारण काय आहे याचीसुद्धा शहरातील नागरिकांमध्ये खमंग चर्चा सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे तरी सर्व मुद्यांना अनुसरून सर्व बाबींचा व समस्या लक्षात घेता सदर योजनेच्या कामाबाबत न. प. प्रशासनाने चौकशी समिती बसवून त्याचा चौकशी अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराला कुठल्याच कामाचे देयक अदा करण्यात येवू नये अशा प्रकारची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते मितेश मल्ल यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद तेल्हारा यांच्याकडे केली आहे तसेच त्या मागणीच्या पत्राच्या प्रतीलीपी पालकमंत्री ना . बच्चू कडू आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी अकोला, मुख्य कार्यकारी अभियंता प्राधिकरण विभाग अकोला यांच्याकडे पाठविले आहेत .