तेल्हारा (प्रा. विकास दामोदर )- हिवरखेड सह बरेच गावात अजून पर्यंत वृक्ष लागवडी संबंधी ग्रामपंचायतला पत्र नाहीत. तेल्हारा तालुक्यात ग्रामीण भागात वृक्ष लावण्याची गरज आहे. कोरोणाच्या काळात ऑक्सिजनची किती कमतरता भासली आहे हे सर्व जगाला कळले आहे. दरवर्षी तालुकानिहाय व पंचायत समिती अंतर्गत वृक्ष लागवडी बद्दल ठराव असतो .प्रत्येक ग्रामपंचायत ला वृक्ष लागवडीसाठी निवेदन पत्र देण्यात येते झाडे लावण्याची टार्गेट दिले जाते. जून महिना गेला आणि जुलै महिन्याची नऊ तारीख आली . तरीही पण आजवर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातून तेल्हारा पंचायत समितीला अथवा तेल्हारा तहसील कार्यालयाला वृक्ष लागवडी बद्दल पत्र अजून पर्यंत आले नाही. वृक्ष लागवडीमुळे अनेक मजुरांना रोजगार मिळू शकतो .तरी माननीय जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी साहेब यांनी या गंभीर विषयाकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे .असे सर्व ग्रामीण भागातील वृक्षप्रेमीचे म्हणणे आहे. या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास फोन द्वारे संपर्क केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
प्रतिक्रिया
पंचायत समिती तेल्हारा कार्यालयातून ग्रामपंचायत हिवरखेड कार्यालयास अद्यापही वृक्ष लागवडी संदर्भात पत्र मिळाले नाही.
गजानन मेतकर
ग्राम विकास अधिकारी हिवरखेड
प्रतिक्रिया
वृक्ष लागवडीमुळे ऑक्सिजनची कमतरता येणार नाही. म्हणून प्रत्येक गावात वृक्ष लागवड करण्यात यावे जेणेकरून मनरेगा अंतर्गत अनेक मजुर कामगारांना रोजगार सुद्धा उपलब्ध होणार. यामधे प्रतेक ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन काम करावे.व वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात यावे .
सिद्धार्थ गवारगुरु अध्यक्ष म,रा, ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा
वृक्ष प्रेमी
प्रतिक्रिया
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा कार्यालयास ग्रामपंचायती करिता वृक्ष मागणीचे कींवा वृक्ष पुरवण्याचे पत्र अद्यापही पंचायत समितीकडून मिळालेले नाही.
एस डी चिलकर
वनपरिक्षेत्र अधिकारी तेल्हारा
प्रतिक्रिया
तहसील कार्यालयातून किंवा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातून पंचायत समिती तेल्हारा कार्यालयास अद्यापही वृक्ष लागवड कार्यक्रम बद्दल पत्र आले नाही.
बी,जे,चव्हाण
गट विकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा
प्रतिक्रिया
जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणत्याही प्रकारचे वृक्ष लागवडी बद्दल तेल्हारा तहसील कार्यालयास अद्यापही पत्रआले नाही.
डॉ, संतोष येवलीकर
तहसीलदार तेल्हारा