अकोला – प्रहार जनशक्ती पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी लोकजागर मंच संस्थापक अनिल गावंडे यांची आज नियुक्ती करण्यात आली. प्रहार संस्थापक ना.बच्चू कडू यांनी आज मंत्रालयात त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
अनिल गावंडे गेल्या तीन महिन्यापासून प्रहारशी जुळले होते, त्यांचा औपचारिक प्रवेश सोमवारी प्रहार मध्ये झाल्यावर आज त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, सचिव कमलाकर पवार, पुरुषोत्तम आवारे पाटील, ऍड सुधाकर खुमकर अजय तापकीर, मनोज टेकाडे, सुरेश चक्रे, रामदास खोत, दिलीप पिवाल, गोपाल जळमकार, निलेश जवकार, डॉ. खोट्टे इत्यादी उपस्थित होते.