अकोला– राजर्षी छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे-पाटील(संपादक दै.अजिक्य भारत) यांचे शनिवार दि. 26 रोजी व्याख्यान होणार आहे. ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण’ या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन असुन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम मर्यादित व्यक्तिंच्या संख्येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहाता सकाळी 11 वाजता होणार असुन जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांच्या फेसबुक पेजवरुन हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांच्या फेसबुक पेजवर अधिकाधिक संख्येने भेट द्यावी. www.facebook.com/@dioakola या लिकंवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.