सातारा (Satara) जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी (Two classmates) वारंवार बलात्कार (rape on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती (Become pregnant) राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास मेढा पोलीस करत आहेत.
संबंधित 14 वर्षीय पीडित मुलगी जावळी तालुक्यातील रहिवासी आहे. ती आपल्या आई-वडिलांसोबत शेतातच वास्तव्याला आहे. एकेदिवशी तिच्याच वर्गात शिकणारी दोन मुलं अल्पवयीन मुलीच्या शेतातील घरी आले. त्यांनी घरात कोणी नसल्याचं पाहून चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. तसेच आरोपींनी अत्याचाराचं मोबाईलवर चित्रीकरण देखील केलं. यानंतर आरोपींनी मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे पीडितेवर अनेकदा बलात्कार केला. यातूनची पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे.
दरम्यान पोटात दुखत असल्यानं पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपास केला असता पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही आरोपी पोलीस तपासात दोषी आढळले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. बलात्कार झाल्यानंतर पीडितेनं बदनामी होईल, म्हणून घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली नव्हती. याचा फायदा आरोपींनी घेतला आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. या घटनेचा पुढील तपास मेढा पोलीस करत आहेत.