• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

दोन बायका फजिती ऐका! विवाहित तरुणाला GF सोबतही करावं लागलं लग्न; आता दोघींना द्यावे लागणार 3-3 दिवस

सोशल मीडियावर (Social Media) झालेल्या ओळखीनंतर युवक आपल्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relation) राहू लागला. यादरम्यान ही तरुणी गरोदर राहिली आणि तिनं एका बाळाला जन्म दिला.

Team by Team
June 19, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
258 5
0
marriage
39
SHARES
1.9k
VIEWS
FBWhatsappTelegram

लखनऊ : एक अत्यंत रंजक असं प्रकरण आता समोर आलं आहे. यात एका विवाहित तरुणाचा दुसऱ्यांदा विवाह केला गेला. आता त्याला आठवड्यात 3-3 दिवस आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावं लागणार आहे. हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावरुन जडलेल्या प्रेमाचं (Facebook Friendship) आहे. सोशल मीडियावर (Social Media) झालेल्या ओळखीनंतर युवक आपल्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relation) राहू लागला. यादरम्यान ही तरुणी गरोदर राहिली आणि तिनं एका बाळाला जन्म दिला.

आधीपासून विवाहित असलेला युवक या घटनेनंतर गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी परतला. त्याची गर्लफ्रेंड त्याचा शोध घेत अखेर त्याच्या गावापर्यंत पोहोचली. ही तरुणी तिथे पोहोचताच एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर युवकाच्या पत्नीलाही त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हावं लागलं. यानंतर या युवकानं आपल्या गर्लफ्रेंडसोबतही लग्नगाठ बांधली. इतकंच नाही तर दोन्ही पत्नींमध्ये त्याचं वाटपही झालं.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या युवक आता आपल्या दोन्ही पत्नी आणि आई-वडिलांसोबतही राहाणार आहे. त्याला आता आपल्या दोन्ही बायकांसह मुलांचाही सांभाळ करावा लागणार आहे. या वाटपानुसार आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवार तो आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहाणार. तर, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दुसऱ्या पत्नीसोबत. रविवारी त्याला आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवावा लागेल.

ही घटना उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील ढोंकपुरी टांडा परिसरातील आहे. दीड वर्षापूर्वी या तरुणाची भेट आसाममधील एका मुलीसोबत फेसबुकवरुन झाली. दोघांची मैत्री हळहळू प्रेमात रुपांतरित झाली. यानंतर दोघेही चंदीगडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यादरम्यान तरुणी गर्भवती झाली. तरुणीला याबाबत काहीही भनक नव्हती की तिचा बॉयफ्रेंड विवाहित आहे.

ही तरुणी गरोदर असल्याचं समजताच युवक गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी फरार झाला. याच काळात या मुलीनं बाळाला जन्म दिला. मुलाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ही तरुणी त्याच्या शोधात युवकाच्या गावी पोहोचली. पोलिसांच्या मदतीनं ती आपल्या बाळाच्या बापापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. हे प्रकरण उघड होताच युवकाच्या घरी एकच गोंधळ उडाला. बराच वेळ चाललेल्या गोंधळानंतर अखेर या युवकाला आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करावं लागलं. आता त्याला आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावं लागणार आहे.

Tags: viral news
Previous Post

सोमवारपासून (दि.२१) निर्बंधात आणखी शिथिलता: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झाला निर्णय

Next Post

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
Next Post
milkha singh

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

vaccination

Corona Vaccination: ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण आजपासून

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.