अकोला- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांची) अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.२१ ते सोमवार दि.२८ दरम्यान पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात गरजू युवक युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला द.ल.ठाकरे यांनी केले आहे.
या मेळाव्यात खालील कंपन्या सहभागी होणार आहेत.
१. वर्ल्डवाईड ऑईलफिल्ड मशिन प्रा.लि. पुणे, एकूण रिक्तपदे २०, किमान एच.एच.सी. पास,
२. रुचा इंजिनिअरिंग प्रा.लि. युनिट ३, औरंगाबाद एकुण रिक्तपदे २०, किमान एच.एच.सी. पास,
३. मेटलमॅन ऑटो प्रा.लि. औरंगाबाद एकुण रिक्तपदे २०, किमान एच.एच.सी. पास,
४. महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चर लि., पुणे एकुण रिक्तपदे १०० पात्रता किमान एच.एच.सी. पास,
याप्रमाणे एकुण १५० पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात बारावी, पदवीका,पदवी धारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करुन सहभागी होता येईल.
असे व्हा सहभागी-
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या – www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या बारावी / पदवी /पदवीका पुरुष तसेच महिला उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या लॉगीन मधुन ऑनलाईन अर्ज करावा. ज्या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केली नाही त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ नोंदणी करुन ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कंपनी/उद्योजक/एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबवितील.
अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन, सहायक आयुकत , जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला द.ल.ठाकरे यांनी केले आहे.