भारतात रेशन कार्डद्वारे स्वस्त दरात धान्य घेण्याची सुविधा मिळते. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तर सरकारच्या खास स्किम पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत धान्य मिळू शकतं. आता कोरोना काळात सरकारने गरीबांना फ्रीमध्ये धान्य देण्याची घोषणा केली होती. अनेक राज्यांमध्ये नागरिकांना मोफत धान्य दिलं जात आहे. दिल्ली आणि यूपीमध्ये तर सरकार विना रेशन कार्ड गरीबांना धान्य देत आहे. परंतु जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल, तर आता घरबसल्या स्मार्टफोनवरुन ऑनलाईन रेशन कार्डसाठी अप्लाय करता येऊ शकतं.
असं करा ऑनलाईन अप्लाय –
– रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी mahafood।gov।in वर क्लिक करुन अर्ज करता येईल.
– त्यानंतर Apply online for ration card वर क्लिक करा.
– रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रुफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जाऊ शकतं.
– रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठीचं शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करावं लागेल आणि अॅप्लिकेशन सबमिट करा.
– फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य ठरल्यास, तुमचं रेशन कार्ड तयार होईल.
(वाचा – आता मोबाईल नंबरशिवाय डाउनलोड करता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस)
कोण करू शकतं रेशन कार्डसाठी अप्लाय –
भारताचा नागरिक रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षांखालील कमी वयोगटातील मुलांचं नाव पालकांच्या रेशन कार्डमध्ये सामिल केलं जातं. 18 वर्षावरील लोक आपल्या वेगळ्या रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकतात.
रेशन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जाऊ शकतं. त्याशिवाय पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, वीज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट पासबुक, रेंटल अॅग्रिमेंटसारखी कागदपत्रही लागू शकतात.