अकोला: अकोला शहरातल्या अकोट फैल परिसरातील दोन गोडाऊनला भीषण आग या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फर्निचर आणि वेस्टेज पॉलिथिनचे हे गोडाऊन होते. लॉकडाऊन असल्यामुळे हे दोन्ही गोडाऊन बंद होते. आगीत कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारच्या सुमारास अचानक या दोन्ही गोडाऊनमधून धूर येताना नागरिकांना दिसले. नागरिकांनी लगेच अग्निशमन विभागाला माहिती दिली. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत 40 ते 45 लाखाचं नुकसान झाल्याची माहिती गोडाऊन मालक यांनी दिली आहे