• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या, गावकऱ्यांनी प्रेयसीला मारहाण करत मृतदेहासोबत लावलं लग्न

घटनेत प्रियकरानं गळफास घेत आत्महत्या (Minor Dies by Suicide) केली आहे. तर, या घटनेनं वैतागलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबत प्रेयसीचं लग्न लावून दिलं आहे.

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
suicide
14
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोनाच्या संकटादरम्यान आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. या घटनेत प्रियकरानं गळफास घेत आत्महत्या (Minor Dies by Suicide) केली आहे. तर, या घटनेनं वैतागलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या (West Bengal) बर्दवान भागातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते. दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मात्र, मुलगा अल्पवयीनं असल्यानं मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला आणि यातूनच मुलानं आत्महत्येचं पाऊल उचललं.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आत्महत्या करण्याआधी या मुलानं आपल्या प्रेयसीला सांगितलं, की तो आत्महत्या करत आहे. यानंतर त्यानं व्हॉट्सअॅपवर प्रेयसीला आपला फोटो पाठवला आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना मारहाण केली. यानंतर दोघींलाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आलं. यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगात कुंकू भरण्यात आलं.

मृताच्या शेजाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की या मुलीला याची कल्पना होती, की मुलगा आत्महत्या करत आहे. या मुलीकडे त्याच्या आईचा फोन नंबरही होता. मात्र, तरीही याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी तिनं माहिती दिली नाही. वेळेवर मुलाच्या घरच्यांना याबाबत माहिती दिल्यास त्याला वाचवता आलं असतं, असं त्यांनी म्हटलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार मुलीच्या आईनंही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आरोपींविरोधात लवकरच कारवाई केली जाईल.

Tags: crime news
Previous Post

मुंबई मेट्रो-2A आणि मेट्रो-7 च्या चाचणीला हिरवा झेंडा

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

agriculture minister dadaji bhuse

राज्यातील कृषि दुकाने लॉकडाऊन काळात दिवसभर सुरु राहणार; कृषिमंत्री दादा भुसे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.