तेल्हारा (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात 132 पत्रकारांचे कोरोनाने बळी गेले तसेच पत्रकारांच्या बळी गेलेल्या नातेवाईकांची संख्या 200 पेक्षा जास्त आहे. काहींच्या घरातील दोन-दोन, तीन-तीन माणसं मृत्युमुखी पडली, अनेक संसार रस्त्यावर आले हे सारं अलहाय्यपणे बघत बसण्याशिवाय हाती काही उरलं नाही याकडे सरकारनं दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना आणि जिवंत पत्रकारांना वाऱ्यावर सोडलंय साधी लस देण्याची मागणी देखील सरकार पूर्ण करीत नाही.
त्यामुळे गेल्या नऊ महिन्यात जे पत्रकार मित्र आपल्याला सोडून गेले आहेत त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्याचा ऑनलाईन कार्यक़म रविवार 23 मे 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आला होता यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे वतीने सुद्धा आहेत त्या ठिकाणी दिवंगत पत्रकार बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.