दर्यापूर (निखिल देशमुख)- चांदखेड येथील रस्त्यावरील काट्यांची झुडपे मोठया प्रमाणात वाढून रस्त्यावर त्यांचा कल गेलेला आहे. त्यामूळे आजच्या उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्या काट्या फांद्या रस्त्यावर पडून त्याचे ये जा करणाऱ्या लोकांना व गावातील सर्वसामान्य नागरीकांना आपले वाहन नेताना मोठया प्रमाणात त्रास होतो. तसेच रोडवरून दोन्ही बाजूने वाहन आले तर फटका लागून अपघात होण्याची संभावना मोठया प्रमाणात आहे. व बरेच जण यामुळे वाहन घेउन कोसळले सुध्दा आहेत.
हा रोड जिल्हा परिषद बांधकाम विभाग मध्ये येतो.या रस्त्यावर कोणी मरणाची वाट प्रशासन पाहत आहे का असा जाब विचारून तात्काळ या झुडपे, काट्यांचा बंदोबस्त शासनाने करावा अशी मागणी प्रहार कार्यकर्ते तेजस गणेशपुरे यांनी प्रहार कार्यकर्ते पवन भांडे, सागर राऊत, निखिल गणेशपुरे, संकेत भांडे, अंकुश भांडे, सोपान भांडे, ज्ञानेश्वर भांडे व गावातील सर्व नागरिकांच्या वतीने केली आहे.