• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बुलडाणा: पतीचे अनैतिक संबंध झाले उघड, पत्नीने 3 वर्षांच्या मुलीसह मारली विहिरीत उडी!

Team by Team
May 20, 2021
in Featured, Buldhana
Reading Time: 1 min read
81 1
0
बुलडाणा: पतीचे अनैतिक संबंध झाले उघड, पत्नीने 3 वर्षांच्या मुलीसह मारली विहिरीत उडी!
13
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

बुलडाणा : बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील रायपूर येथील माळवंडी इथं एका विवाहित महिलेनं आपल्या 3 वर्षांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्याकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील माळवंडी येथील पल्लवी गणेश चव्हाण (वय 30) हिने मुलगी जान्हवी गणेश चव्हाण (वय 3) हिला घेऊन विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मृत महिलेच्या वडिलांनी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या; लग्नाला झालं होतं फक्त एक वर्ष

यामध्ये पल्लवीचे पती गणेश चव्हाण याचे बाहेर अनैतिक संबंध होते. यावरून दोघांमध्ये वाद होत होता. त्यामुळे तो तिला मारहाण करायचा. तर पती सासू, सासरे व ननंद हे तिला माहेरावरून शेतीचा वाटा आण यासाठी त्रास द्यायचे. तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून पल्लवीने टोकाचे पाऊल उचलले. आपल्या 3 वर्षांची मुलगी जान्हवी चव्हाण हिच्यासह गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

या प्रकरणी पोलिसांनी मृतक महिलेच्या वडिलांच्या तक्रारी वरून गुन्हे दाखल केले आहे. प्रेत पंचनामासाठी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून तिघांचा आत्महत्या

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात (Dhule District) एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या (Mass suicide) केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दमाशी येथील तापी नदीच्या पुलावरून (Tapi river bridge) या कुटुंबाने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद गावात राहणारे राजेंद्र रायभान देसले यांनी आपली पत्नी आणि मुलीसह नदीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. धरणगाव-एरंडोल तालुका शेतकरी संघाचे ते संचालक असल्याची माहिती समोर येत आहे. राजेंद्र रायबन पाटील (51) हे आपली पत्नी वंदना राजेंद्र पाटील आणि मुलगी ज्ञानल सोबत अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.

कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे कुटुंब आपल्या कारने भोद येथे जाण्यासाठी निघाले होते मात्र, काही वेळात त्यांचा मोबाइल क्रमांक बंद झाला. नातेवाईकांनी त्यांच्यासोबत संपर्क साधला मात्र, फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 17 मे रोजी त्यांची कार तापी नदीजवळ आढळून आली. यानंतर नदीपात्रात शोधाशोध सुरू करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर तिघांचे मृतदेह आढळून आले.

Tags: buldhana newsbuldhana news marathi
Previous Post

आता Ration Card शिवायही धान्य मोफत मिळणार, सरकारकडून मोठा दिलासा

Next Post

मध्यप्रदेशमुळे अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय..!

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
health worker corona warrier

मध्यप्रदेशमुळे अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय..!

खतांच्या किंमती पूर्ववत: शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी

खतांच्या किंमती पूर्ववत: शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते उपलब्ध करून देणार - नरेंद्र मोदी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.