काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे कोविडवर उपचार घेत होते. 29 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. तातडीने गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती. मुंबईल येथील डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, मागील आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे चोवीस तासांपैकी काही तासच त्यांना व्हेंटिलेंटरवर ठेवले जात होते. त्यानंतर शुक्रवारी हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी डॉ. राहुल पंडित यांना सोबत घेऊन पुणे गाठले. त्यानंतर डॉ. पंडित यांनी खासदार अॅड. सातवांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी डॉ. पंडित मुंबईला रवाना झाले. खासदार अॅड. सातव यांच्या आई तथा माजी मंत्री रजनी सातव शनिवारी दुपारीच पुणे येथे पोहोचल्या आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विेशजित कदम पुणे येथे ठाण मांडून होते.
नव्या व्हायरसमुळे सातव यांची प्रकृती होती नाजूक
राजीव सातव कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता.त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (ता. १५) जालना येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. ते व्हेंटिलिटरशिवाय श्वास घेत होते. मात्र, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. आपण त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले होते.
राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे.
‘राजीव सातव यांच्या निधनाने मी दुखी झालो आहे. ते एक प्रतिभावंत नेते होते. आमच्या सर्वांसाठी ही मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत’, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
I’m very sad at the loss of my friend Rajeev Satav. He was a leader with huge potential who embodied the ideals of the Congress.
It’s a big loss for us all. My condolences and love to his family. pic.twitter.com/mineA81UYJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021