अकोला- करोना प्रदूर्भावाची साखळी तोडण्या साठी अकोला शहरात सध्या कडक लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे, कडक लॉक डाऊन मध्ये वैद्यकीय सेवा सोडून सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे, अगदी जीवनावश्यक सेवांची आस्थापने सुद्धा बंद करण्यात आले आहेत, ह्या कडक लॉक डाऊन ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर असल्याने कडक उन्हात सुद्धा पोलिसांचा खडा पहारा चौका चौकात ठेवण्यात आला आहे, विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी चौका चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ह्यांना तैनात करण्यात आले असून कडक उन्हात थांबून ते प्रत्येक वाहने चेक करून विनाकारण फिरणारी वाहने जप्त करून वाहन चालकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येत आहे, अश्या कडक उन्हात आपले कर्त्यव्य बजावत असतांना वाहतूक पोलीस आपल्या प्रमाणिकतेचा परिचय सुद्धा देत आहेत.
आज दुपारी स्थानिक अशोक वाटिका चौकात शहर वाहतूक शाखेचे पोलीस मदन करवते व होमगार्ड सुहास अवझाडे हे तैनात राहून आपले कर्त्यव्य पार पाडीत असतांना त्यांना चौकात रस्त्यावर एक सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाईल पडलेला दिसला नुकत्याच जिल्हा सामान्य रुग्णालय कडे गेलेल्या दुचाकी चालक जेष्ठ नागरिकांचा तो मोबाईल असल्याची त्यांना शंका आली, ते परत येतील म्हणून त्यांनी तो स्वतः जवळ ठेवून घेतला, थोड्या वेळाने त्या मोबाईल वर एक कॉल आला व त्यांनी चौकशी केली असता माहिती झाले की सदर मोबाईल हा श्याम जोशी राहणार श्यामदीप हॉस्पिटल, पत्रकार कॉलोनी अकोला ह्यांचा आहे, मदन करवते ह्यांनी त्यांना ओळखपत्र व कागदपत्रांसह बोलावून खात्री करून सदर मोबाईल त्यांना परत केल्यावर श्याम जोशी ह्यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस मदन करवते व होमगार्ड सुहास अवझाडे ह्यांचे आभार व्यक्त केले, वाहतूक पोलिसांच्या ह्या प्रामाणिक पणा बद्दल पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस अमलदारांनी त्यांचे कौतुक केले आहे।